गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धांच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न करणारे नरेंद्र दाभोलकर यांचे हे रोखठोक पुस्तक. हे पुस्तक म्हणजे बुवाबाजीचा समग्र पंचनामा आहे, असे ते म्हणतात. धर्म, अध्यात्माच्या नावाखाली जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या, लुबाडणाऱ्या बुवांचा बुरखा दाभोलकर यांनी फाडला आहे. मात्र बुवाबाजी हा केवळ धर्माशी संबंधित विषय नाही; तर त्यास अर्धिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक बाजू लाभल्या आहेत. या सर्व बाजूंचा उलगडा पुस्तकातून विस्तृतपणे होतो. अंधश्रद्धेला अथवा बुवाबाजीला माणसे सहजासहजी बळी का पडतात, याचे एक कारण म्हणजे मानसिक कुमकुवतपणा. माणसे अशी सहजासहजी सैरभैर का होतात, अशा कळीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही पुस्तकातून होतो.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|