परदेश प्रवास ही आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. मात्र परदेशातील विविध गोष्टींची, चालीरीतींची, तेथील स्थळांची माहिती प्रत्येकाला हवी असते. अशी माहिती देणारी पुस्तके बऱ्याच वेळा अमेरिकेसंबंधीच जास्त असतात. इतर देशांची माहिती देणाऱ्या पुस्तकांत या पुस्तकाचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल. जयश्री कुलकर्णी यांनी आतापर्यंत नव्वद रहस्यकथा, काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. साहित्यिक असलेल्या कुलकर्णी यांनी हे पुस्तक ललित शैलीत लिहिले आहे, ऑस्ट्रेलियातील अनुभव तेथील मुक्कामात त्यांना ऑस्ट्रेलियाचे जाणवलेले वेगळेपण त्यांनी ओघवत्या शैलीत मांडले आहे. ऑस्ट्रेलियाचे हे रूप अनोखे आणि वाचनीय असे आहे. कुलकर्णी या केवळ पर्यटनासाठी तिकडे गेल्या नव्हत्या. मुलाकडे त्यांचा बरेच दिवस मुक्काम होता, त्यामुळे अनेक बाबी समजून घेत, त्याची सखोल माहिती देऊन त्यांनी वाचकाला ऑस्ट्रेलियाची सफर चांगल्या रीतीने घडवून आणली आहे. देखणे मुखपृष्ठ आणि चांगली निर्मिती असलेले हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन नसून, ऑस्ट्रेलियाच्या इतिहास-भूगोलाचाही परिचय करून देते.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|