काही शब्द असे असतात, कि ते चारचौघात उच्चारायलाही लाज वाटावी. मग असे शब्द वापरून तयार केलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार वापरणं तर लांबच! पण अनेकदा खासगीत किंवा काही समाजांमध्ये सर्रास सर्वांसमोर अशी वाक्ये वापरली जातात. अशा असभ्य समजल्या जाणा-या म्हणी आणि वाक्यप्रचारांची रंजक माहिती अ. द. मराठे यांनी या पुस्तकात करून दिली आहे.
हा एक विस्तृत अभ्यास आहे. या अभ्यासाचा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. ते सांगतात, 'मराठीत साहित्यासंबंधी प्रचलित असलेले सुसंस्कृत, ग्राम्यापणा, अभद्र या शब्दांचे अर्थ व्यक्तीसापेक्ष आहेत. सापेक्ष असणा-या संकल्पनांची अशी उच्चनीच वर्गवारी करणे मला अयोग्य वाटते.' लोकजीवनाचे नैसर्गिक प्रकटीकरण करणा-या या म्हणी आणि वाक्यप्रचारांचा हा आगळावेगळा कोष.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|