अशोक जैन हे एक विचक्षण पत्रकार म्हणून महाराष्ट्रात व दिल्लीतही सर्वज्ञात आहेत आणि एक अग्रणी अनुवादक म्हणूनही मान्यताप्राप्त आहेत. त्यांच्या मार्मिक उपहासगर्भ शैलीचा वाचकांना चांगलाच परिचय आहे. वास्तविक जैन यांनी यापलीकडेही जाऊन आगळ्या लेखनशैलीत बरंच लेखन केलं आहे; विविध विषयांना स्पर्श केलेला आहे. उदाहरणार्थ दिल्लीच्या वास्तव्यात केलेली सूक्ष्म व्यक्तिनिरीक्षणं, स्थलवर्णनं, कलाकृतींवरील आस्वादी निरीक्षणं; त्याचप्रमाणे कधी ‘आचार्य अत्रे’ शैलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग, तर कधी दूरदर्शन मालिका, ‘गेम शोज’ यांचा घेतलेला ‘समाचार’.... तर कधी अंतर्मुख होऊन एकंदर अनुवादाच्या प्रक्रियेचाच घेतलेला सूक्ष्म धांडोळा. प्रस्तुत संग्रहाद्वारे जैन यांच्या अशा आगळ्या लेखनशैलीतील लेखांचं संकलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशोक जैन यांची पारदर्शक मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी, व्यापक संचार करणारी लेखणी आणि त्यांचं सर्वस्पर्शी लेखन याचं वाचकांना एकाच पुस्तकातून समग्र दर्शन घडावं, या दृष्टीनेच प्रस्तुत लेखसंग्रहाचा प्रपंच... ‘अत्तराचे थेंब’!

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|