वाणी हीच बोरकरांच्या जीवनाची अखंड सहचरी, जिवाभावाची सखी. जे सुचेल, रुचेल त्यावर लिहीत गेले. तो त्यांचा नित्याचा व्यवहारच बनला. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी त्यांनी कवितेची दीक्षा घेतली, तेव्हापासून मृत्युपर्यंत त्यांनी तिच्या संकीर्तनात, आराधनेत कधी खंड पडू दिला नाही. ज्या काळात बोरकरांनी काव्यक्षेत्रात पदार्पण केले, तो काल काव्यदृष्ट्या क्षीणबळ व परंपरेच्या रसस्पर्शाला मुकलेला होता. या बरड पार्श्वभूमीवर बोरकरांची कविता आपल्या पृथगात्मतेने उमटून दिसते. या पृथगात्मतेच्या उसळत्या उल्हासातूनच बोरकरांच्या काही चिरतरुण आणि चीररुचीर कवितांचा जन्म झाला. मराठी कवितेच्या क्षेत्रातील ही त्यांची संस्मरणीय कामगिरी.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|