भारताच्या फाळणीसाठी कॉंग्रेसला व गांधीजींना ‘जबाबदार’ धरायचे की त्यांना फाळणीचे ‘श्रेय’ द्यायचे? ‘गांधीजींमुळेच आम्ही फाळणी स्वीकारली,’ असे नेहरू म्हणाले ते काही खोटे नव्हते. एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली.
..ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी सखोल संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे. राजहंस प्रकाशनतर्फे तो प्रसिद्ध होत आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|