भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिच्या या रोमांचक अनुभवकथनात आपल्या बालपणीच्या दिवसांबद्दल, बॅडमिंटनच्या विश्वामधील पदार्पणाबद्दल, आयुष्यातील जवळच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल, करिअरमधील चढ-उतारांबद्दल, जिल्हा पातळी ते ऑलिम्पिकमधील थक्क करणाऱ्या विजयांबद्दल बोलते आहे. या सोबत खेळासंदर्भातील उपयुक्त टीप्सही ती देते आहे. आत्तापर्यंत तिच्याविषयी माहिती नसणाऱ्या अनेक गोष्टी ती वाचकांबरोबर या पुस्तकाव्दारे शेअर करते आहे.
सायना म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तिचा प्रसन्नचित्त, लोभसवाणा चेहरा आणि तिचं ते आत्मविश्वासपूर्ण हास्य! क्रीडाविश्वातील एक अदभुत व्यक्ती या ओळखीबरोबरच या पुस्तकात सायना आपल्याला एका मुलीच्या, बहिणीच्या, शिष्याच्या आणि चारचौघींसारख्या एका युवतीच्या भूमिकेतही भेटते.
सायनाचा रोजचा दिवस कसा असतो?
कठोर परिश्रमाचा, कसून केलेल्या सरावाचा आणि कडक डाएटचा! त्यात मैत्रिणींशी गप्पा-टप्पा, सिनेमा किंवा पार्टीला जाणं याला वाव नसतो. म्हणजे नुसतंच बॅडमिंटन एके बॅडमिंटन असंही नाही. मॅच जिंकल्यानंतर सायना आइस्क्रीम खाऊन विजय साजरा करते. तिला आयपॅडवर गेम्स खेळायला आवडतं आणि ती शॉपिंगलाही उत्साहाने जाते.
जागतिक पातळीवर दुसऱ्या-तिसऱ्या मानांकनावर असणाऱ्या आणि पद्मश्री व खेलरत्न पुरस्काराने सन्मानित अशा सायनाचं हे पुस्तक एका खेळाडूचा चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे उलगडून दाखवतं.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|