विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक राजकारणाची जडणघडण जाणून घेण्याच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाला विशेष महत्व प्राप्त झाले झालेले आहे. कारण हिटलरच्या आक्रमक हुकुमशाहीविरुद्ध झुंज घेण्यासाठी लढल्या गेलेल्या या संघर्षाच्या अखेरीस, या विशाल समराचे दायित्व
अंगावर घेणाऱ्या राष्ट्रांची पुरी दमछाक झाली आणि त्यामुळे रणांगणावर विजयश्री मिळवूनही, राजनैतिक आघाडीवर त्यांच्या
पदरी अपयश आले. त्याचंप्रमाणे दुसऱ्या एका साम्राज्यवादाला बळ प्राप्त करून द्यायलाही हा संघर्ष कारणीभूत ठरला. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात युरोपीय आणि जागतिक राजनीतीने अनेक वळणे द्यायलाही हा संघर्ष कारणीभूत ठरला. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात युरोपीय आणि जागतिक राजनीतीने अनेक वळणे घेतली; इतकी की महायुद्धोत्तर जगाचे रूपच पालटून गेले. त्यामुळे केवळ, अनेक राष्ट्रांना आपली धग पोचविणारा संघर्ष
एवढेच महायुद्धाचे स्वरूप मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय राजकारणातील नवे तणाव आणि पेच यांच्यामधील प्रेरणा
समजावून घेण्याच्या दृष्टीनेही दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|