मुरारीराव घोरपडे व अठराव्या शतकातील दक्खन
पानिपत हि मराठ्यांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकावण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठ्यांची उत्तरेकडील घौडदौड थांबली. मात्र पानिपतच्या पराभवाचे तरंग दक्षिणेतही उमटल्यावाचून राहिले नाहीत. मराठ्यांच्या पराभवाची वार्ता कळाताच हैदर अली, निजाम यांना स्फुरण चढले व ते अधिक त्वेषाने मराठ्यांविरूद्ध एकत्र आले. त्याचवेळी दक्षिणेत मोगलांना जिवाच्या कराराने रोखून धरणाऱ्या मराठा सरदारांकडे पानिपतच्या मन्वंतरानंतर पुणे, सातारा व कोल्हापूर या तिन्ही मराठा सत्ता केंद्रांचे दुर्लक्ष होऊ लागले. तरीसुद्धा तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठ्यांनी स्वबळावर हैदर अली, निजाम, इंग्रज आणि पाँडेचेरीतील फ्रेंच यांच्याशी झुंज देणे सुरूच ठेवले. या चारही आक्रमकांना जिवात जीव असेपर्यंत तोंड देऊन दक्षिणेतील गुत्तीचे राज्य मराठ्यांच्या हातून सुटू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुरारीराव घोरपडे हे शेवटचे मराठा सेनापती. हैदरच्या विरोधात त्यांनी दिलेली एकाकी झुंज हा मराठ्यांचा शौर्याचा, अतुलनीय घोडदळाचा व त्याचवेळी आपसातील दुफळीचा, फंदफितुरीचा आणि मराठा सत्ताकेंद्रानी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांचा दाखलाच म्हणता येईल.
मुरारीराव घोरपडे व अठराव्या शतकातील दक्खन पानिपत हि मराठ्यांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकावण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठ्यांची उत्तरेकडील घौडदौड थांबली. मात्र पानिपतच्या पराभवाचे तरंग दक्षिणेतही उमटल्यावाचून राहिले नाहीत. मराठ्यांच्या पराभवाची वार्ता कळाताच हैदर अली, निजाम यांना स्फुरण चढले व ते अधिक त्वेषाने मराठ्यांविरूद्ध एकत्र आले. त्याचवेळी दक्षिणेत मोगलांना जिवाच्या कराराने रोखून धरणाऱ्या मराठा सरदारांकडे पानिपतच्या मन्वंतरानंतर पुणे, सातारा व कोल्हापूर या तिन्ही मराठा सत्ता केंद्रांचे दुर्लक्ष होऊ लागले. तरीसुद्धा तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठ्यांनी स्वबळावर हैदर अली, निजाम, इंग्रज आणि पाँडेचेरीतील फ्रेंच यांच्याशी झुंज देणे सुरूच ठेवले. या चारही आक्रमकांना जिवात जीव असेपर्यंत तोंड देऊन दक्षिणेतील गुत्तीचे राज्य मराठ्यांच्या हातून सुटू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुरारीराव घोरपडे हे शेवटचे मराठा सेनापती. हैदरच्या विरोधात त्यांनी दिलेली एकाकी झुंज हा मराठ्यांचा शौर्याचा, अतुलनीय घोडदळाचा व त्याचवेळी आपसातील दुफळीचा, फंदफितुरीचा आणि मराठा सत्ताकेंद्रानी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांचा दाखलाच म्हणता येईल.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|