विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
० बादशहाची अंगठी ० गंगटोकमधील गडबड ० सोनेरी किल्ला
० दफनभूमितील गूढ ० कैलासातील कारस्थान ० रॉयल बेंगॉलचे रहस्य
० गणेशाचे गौडबंगाल ० केस-‘अॅटॅची’ केसची ० काठमांडूतील कर्दनकाळ
० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|