मराठीचे सर्वोत्कृष्ट निसर्गकवी म्हणून बालकवी सा-या काव्यरसिकांस परिचित आहेत. झाडाझुडपात, द-याखो-यात, निर्झर-नद्यांत, आकाश-अवकाशात ठायी ठायी भरलेले दिव्य सौंदर्य त्यांनी बेभान होऊन गोळा केले. किंबहुना रांगड्या मराठी मनाला निसर्गाच्या अलौकिक रुपाने सूक्ष्म चमत्कार बघायला त्यांनीच शिकविले. त्यांची संगीतमय सुरेल कविता या किंवा त्या कालखंडाची, या किंवा त्या साहित्यिक वादाला साकार करणारी कविता नाही. ती निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून जगू पाहणा-या महामानवाचीच चिरंतनाची व्यथा आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|