आयआयटीत असताना आयुष्यानं एक वेगळंच वळण घेतलं आणि आमच्या गटातले अनेकजण इतिहास, तत्वज्ञान, साहित्य, संगीत, विज्ञानआणि अर्थशास्त्र या सगळ्यात प्रचंड रस घेऊन वाचन, चर्चा करायला लागले. त्यावेळी अमेरिकेतल्या इतिहासावर चर्चा चाले. त्यात मग ब्लॅकचळवळ, ब्लॅक पँथर वगैरेंवर रात्र-रात्र वादचर्चा चालत. मार्टिन ल्यूथर किंग, रोझा पार्क्स, अँजेला डेव्हिस यांच्याविषयी आणि त्यांच्याविचारांविषयी आणि चळवळींविषयी आम्ही वाचत आणि बोलत असू. त्यातलं काय बरोबर आणि काय चूक हाही आमच्या जिव्हाळ्याचा विषयझाला होता.
ब्लॅक पँथरकडून स्फूर्ती घेऊन दलित पँथरची चळवळ उभी राहिली होती. यामुळे ब्लॅक पँथर आणि एकूणच काळ्या चळवळीला एक वेगळा संदर्भप्राप्त होत होता. व्हिएतनाम युद्धाविरोधाचा चळवळ, हिप्पी संस्कृती, बीट संगीत आणि विद्यार्थ्यांचा संघर्ष या सगळ्यांबरोबरच काळ्यांचाचळवळ ही प्रस्थापितांविरुद्धची एक चळवळ होती. त्यात खूपच हिंसा होती. ती जरी मला मान्य नसली तरी एकंदरीत त्या चळवळीबरेाबर खूपचभावनिक जवळीक निर्माण झाली होती हे मात्र खरं. पण त्या काळी ते सगळं पुस्तकी होतं. बरंचसं रोमँटिसिझममधून आलेलं होतं हे आजजाणवतंय. पण यामुळे एरव्ही कधीच कळलं नसतं अशा एका अस्वस्थ जगाचं दालन मला खुलं झालं होतं.
यानंतर आदिवासी चळवळ, त्यातून परतून इन्फर्मशन टेक्नॉलॉजीत काम करायला लागणं हे सगळं घडलं होतं. यानंतर पुन्हा एकदा ब्लॅकसंस्कृतीशी माझा संबंध येणार हेाता. ते १९८१चं वर्ष असावं. सॉफ्टवेअरच्या एका कामासाठी मी अनेक महिने इंग्लंडला राहिलो होतो. पूर्वीसिंगापूर, मलेशिया इथे गेलेलो असलो तरी पाश्चिमात्य राष्ट्रात ते माझं पहिलंच पाऊल होतं. तिथे मी एक ईआरपी पॅकेज लिहिण्याकरता गेलोहोतो. आज एसएपी, ओरॅकल अशा पॅकेजेसची नावं आपण सर्रास ऐकतो. पण त्याकाळी तशी पॅकेजेस बाजारात नव्हतीच. अशी नवी गोष्ट चक्कनिर्माण करायची म्हणजे मनात एक थ्रिल होतंच.
विमानानं लंडनला पोहोचल्यावर पुढे ट्रेननं लीड्जला जायचं होतं. ट्रेनमध्ये माझ्या डब्यात इतर बहुतांशी गोर्या मंडळींबरेाबर काही भारतीयआणि पाकिस्तानी मंडळी होती. ब्रिटिश मंडळी या सगळ्यांनाच ‘पाकी’ म्हणत. लीड्जजवळ ब्रॅडफर्ड नावाचं एक ठिकाण आहे. तिथे काही भारतीयआणि बरीचशी पाकिस्तानी अशी आशियाई मंडळी राहायची. अजूनही रहातात. गाडी सुटायच्या वेळेपर्यंत डब्यात काही काळी मंडळीही चढली.दिसायला ती धिप्पाड होती आणि जरा विचित्रच होती.
तशी हॉलिवूडच्या सिनेमात मी काळी मंडळी बघितली नव्हती असं नाही. ‘टू सर विथ लव्ह’ हा सिडनी पॉयस्चरचा सिनेमा तर मला खूपचआवडला होता. त्या सिनेमात एक काळा शिक्षक एका शाळेत नव्यानंच रुजू होतो. वर्णामुळे त्याला नोकरी मिळायला खूप अडचणी आलेल्याअसतात. या नव्या शाळेत तिथे भरपूर गोरी मुलं आणि त्यांच्याबरोबर एकच काळा मुलगा असे शिकायला असतात. गोर्या मुलांच्यादांडगटपणाला सगळे घाबरुनच गेलेले असतात. खूप व्रात्यपणा करुनही तो नवा काळा शिक्षक आपला संयम सोडत नाही. काही काळानं त्याशिक्षकाचं मुलांशी छान जमायला लागतं. पण काही प्रसंगांमुळे त्यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण होतो. त्याच वेळी वर्गातल्या एकमेव काळ्यामुलाची आई वारते. इतर मुलं तिच्या अंत्ययात्रेला जायचं का नाही यावरुन गोंधळून जातात. अनेक नाट्यमय प्रसंगांनंतर तो शिक्षक आणित्याचे सगळे विद्यार्थी त्या अंत्ययात्रेत भेटतात, आणि त्यांच्यातला दुरावा संपुष्टात येतो अशा तर्हेची या चित्रपटाची गोष्ट होती.
हॉलीवूडमधल्या सिनेमातली कित्येक काळी मंडळी खूप प्रेमळ असायची. पण ही गाडीत चढलेली मंडळी मात्र तशी दिसत नव्हती. लीड्जयेईपर्यंत ती स्वतःशी काही बोलत बसली होती. भाषा जरी इंग्रजी असली तरी त्यांचे बोलण्याचे हेल आणि पद्धत वेगळी होती. पूर्वीच्या काळीमी काळ्या चळवळींविषयी आणि ब्लॅक पँथरविषयी बरंच वाचन केलं होतं. त्यामुळे ही मंडळी इथे का आणि कशी आली याची बर्यापैकीऐतिहासिक जाणीव मला होतीच. पण ते सगळं ज्ञान पुस्तकी होतं. प्रत्यक्ष त्यांना आता काय वाटत असेल? ते कसे रहात असतील? याबद्दलमनात बर्यापैकी कुतूहल होतंच. त्यामुळे याविषयी विचार करता करता लीड्ज केव्हा आलं ते कळलंच नाही.
इंग्लंडच्या वास्तव्यात माझ्याकडे वॉक्सॉल गाडी होती. त्यातून आम्ही वर्डस्वर्थच्यामुळे प्रसिध्द असलेलं ‘लेक डिस्ट्रिक्ट’ आणि ऑलिव्हरगोल्डस्मिथच्या ‘व्हिकार ऑफ वेकफील्ड’ मुळे प्रसिध्द झालेलं वेकफील्ड यासारख्या यॉर्कशायरमधल्या अनेक ठिकाणी मनसोक्त भटकायचो.भटकतानाही काळी माणसं दिसायची. पण ती फारशी श्रीमंत नसावीत. ती फारशी चैन करताना दिसायची नाहीत. कुठेतरी वेटर किंवा कुठेतरीमदतनीस अशीच कामं ती करायची. ऑफिसमध्येही मॅनेजर सोडाच पण साधे प्रोग्रॅमर्सही कुणी काळी मंडळी नव्हती. मग एका बाजूनं आता तरगुलामगिरी संपलेली असताना अशी का परिस्थिती होती? एवढी विषमता का अजून आहे? या सगळ्यांविषयी माझ्या मनात सतत विचार येत.
त्या काळात बीबीसीवर अनेक चांगले कार्यक्रम लागत. इंग्रजी विनोदबुद्धी मला खूप आवडायची. आज सीएनएनप्रमाणेच बीबीसी म्हणजे एकअधिकृत सरकारी किंवा बड्या उद्योगांनी चालवलेला चॅनेल वाटतो, तसा त्याकाळी अजून झाला नव्हता. रीगन/थँचर यांच्या अतिउजव्याराजकारणानं अजून जनमानसाचा कब्जा मिळवला नव्हता. एकदा चॅनेल बदलताना एका चॅनेलवर ‘दी रुट्स’ नावाची एक मालिका चालली होती.सर्व काळ्यांच्या इतिहासावर रंगवलेली भयानक पण खिळवून टाकणारी अशी ती मालिका होती. सर्वप्रथम काळ्या लोकांना आफ्रिकेतून कसंपकडून युरोप/अमेरिकेत आणलं गेलं, आणताना बोटींवर कसे त्यांचे प्रचंड हाल झाले, त्यात बरेचसे कसे मेले, अनेकांची ताटातूट कशी झालीआणि नंतर त्यांना गुलाम म्हणून मळ्यांवर कसं ठेवलं, त्यांना कशी अतिभयानक, अंगावर काटा येईल अशी वागणूक मिळत असे,त्यांच्यातल्या पिढ्यानपिढ्या अनेक दशकं/शतकं त्यांनी गुलामगिरी कशी सहन केली, त्यांच्यात बंडाची ठिणगी कशी पेटली, त्यांच्या संघटना कशाउभ्या राहिल्या आणि शेवटी त्यांना मर्यादित का होईना पण स्वातंत्र्य कसं मिळालं याविषयी या मालिकेत चित्र रंगवलं होतं. ऍलेक्स हॅलीच्या ‘दीरुट्स’ या कादंबरीवरुन ही मालिका निर्माण केली हेाती. आजवर जगातल्या कानाकोपर्यात या कादंबरीच्या किमान २० लाख प्रती विकल्यागेल्या आहेत. २४ भाषांमध्ये तिचे अनुवाद करण्यात आले आहेत. या कादंबरीच्या प्रकाशनाच्या काळात अमेरिकेमधल्या काळ्या लोकांचा संघर्षबर्यापैकी संपून त्याची जागा आशावादानं घेतली होती. तिचे पडसाद हॅलीच्या लिखाणात आढळतात. २०० वर्षांचा काळ व्यापणारी ही कादंबरीआहे. १७५० साली जन्मलेल्या कुंटा किंटे नावाच्या एका अमेरिकन मुलाच्या आयुष्याच्या कहाणीपासून सुरु होऊन नंतरच्या अनेक पिढ्यांचंचित्रण यात आहे.
ही मालिका बघताना असं वाटलं, प्रत्यक्ष काळ्या लोकांना हे सगळं बघताना काय वाटत असेल? प्रचंड अपमान आणि अन्याय यांची मनातउजळणी होत असताना अंगाची लाहीलाही तर होत नसेल? आणि प्रत्यक्षात झालं तसंच. ही मालिका चालू असताना काळ्यांनी इंग्लंडभर दंगलीकेल्या. प्रचंड जाळपोळ झाली. अनेकांना अटक झाली. टीव्हीवर आणि पेपरात त्याच्याच बातम्या यायच्या. लीड्ज शहरात त्याकाळी बर्यापैकीदहशत पसरली होती. लीड्जपासून जवळ असलेल्या स्कोल नावाच्या लहान खेड्यात आम्ही रहात असू. तिथे बहुतांशी गोरेच रहायचे. गावातल्यापबमध्ये सगळे संध्याकाळी जमायचे. तिथले अनेक गोरेही आता माझे मित्र झाले होते. पावणेअकराला पब बंद हेात असे. तो संपेपर्यंत मीबरेचदा तिथे असे. त्या काळात तिथे याविषयी खूप चर्वणचर्चा चाले. खरंतर इंग्लिश पब म्हणजे एक गंमतशीर ठिकाण. इथे हास्याचे फवारेसतत उडत असतात आणि राजकारणावर शक्यतोवर चर्चा होत नाही. पण हा विषय त्याकाळी खूपच गाजला होता.
ही दंगल बरेच दिवस चालली आणि शेवटी शमली. काळे आणि गोरे यांच्यात अजून इतका फरक होता की काळा मुलगा आणि गोरी मुलगीकिंवा काळी मुलगी आणि गोरा मुलगा यांच्यात प्रेम किंवा लग्न या गोष्टी फारशा होताना दिसतच नव्हत्या. अजूनही त्या फारश्या दिसतनाहीत. याचं कारण रंगभेद तर आहेच पण त्याबरोबर संस्कृतीही आहे. काळ्यांची भाषा, आवडीनिवडी, रहाण्याची पध्दत ही पूर्णपणे वेगळीअसल्यानं आणि गोरे त्या जगण्याच्या पद्धतीला अजून बर्याच वेळा मनातल्या मनात आणि काही वेळा उघडपणे ‘खालचं’ समजत असल्यामुळेअसं होत होतं हे मला समजत होतं. तरीही लीड्जला सिटी-सेंटरपाशी एक काळा मुलगा आणि एक गोरी मुलगी नेहमी हातात हात घालूनजायचे. कदाचित दोघंही जवळच्याच कुठल्याशा ऑफिसमध्ये काम करत असावेत. लंडनलाही मी बरेचदा जात असे. तिथेही अशी दृश्यं दिसतपण तीही खूपच क्वचित. तिथेही एक-दोनदा काळी मुलगी आणि गोरा मुलगा यांच्या जोड्या पाहिल्या होत्या. हे कसे रहात असतील? याविषयीमाझ्या मनात कुतूहल खूपच वाढलं होतं.
इंग्लंडमधले महिने भराभर उलटले. शेवटी इंग्लडहून परतायला एकच महिना राहिला होता. मला घर बदलायचं होतं. मग मी मनाचा हिय्याकरुन तो महिना एका काळ्या कुटुंबात काढायचा ठरवला. ‘पेईंग गेस्ट’ सारखी एक जाहिरात मी बघितली आणि त्यांना भेटायला गेलो. शहराच्यासिटीसेंटरजवळच एका अत्यंत लहान घरात एक काळं जोडपं रहात होतं. त्यांना एक मुलगा होता. तो बराच टपोरी होता. त्यानं शिक्षण अर्धवटचसोडलं होतं. मी त्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहायचं ठरवलं. त्या घरातले आई-वडील जवळच एक बारीकसं टपरीवजा हॉटेल चालवायचे. मीसकाळी तिकडेच नाश्त्याला जायचो. दिसायला ओबडधोबड आणि वरकरणी असंस्कृत वाटणार्या त्या जोडप्याकडे माणुसकी मात्र खूप होती हे मीतिथे रहायला गेल्यावर माझ्या लक्षात आलं. एकदा तर मला जखम झाली, तर त्यांनीच दोन तीन दिवस माझी काळजी घेतली. मला बँडेजलावायचे, घरी चहा करुन द्यायचे. आणि त्याचे पैसे लावणार नाही असं पुन्हा हसून सांगायचे. या प्रसंगानं मी मग त्यांच्या घरातलाच एकझालो होतो. संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर मीही कित्येक संध्याकाळी त्यांच्या हॉटेलवर त्यांच्या मदतीला जात असे. तिथे येणारीगिर्हाईकंही बहुधा काळी मंडळी विंवा क्वचित आशियाई मंडळी असायची. मग खाता खाता ती काळी मंडळी बर्याच गप्पा मारायची.कित्येकदा त्यात एकमेकांची दुःखं समजावून घेणं असे; तर कित्येकदा गोर्यांविषयीचा सुप्त राग असे. नुकत्याच दंगली होऊन गेल्यामुळेत्याविषयी चर्चा चालेच. प्रथम माझ्याकडे बघत ते दबकत बोलत. पण मग काही दिवसात मी त्यांना त्यांच्यातलाच वाटायला लागलो. मग तेखुलायचे. त्यांच्या संस्कृतीचं, रहाण्याच्या, वागण्याच्या, खाण्याच्या आणि बोलण्याच्या पध्दतीचं मला खूप जवळून दर्शन होत होतं. पण तरीहीअजून कुतूहल होतंच.
तो एक महिना कसा गेला ते कळलंच नाही. ब्रॅडफर्डला एका थिएटरमध्ये चक्क हिंदी सिनेमे चालत. त्या काळ्या कुटुंबाला मी माझ्यातर्फेजाण्याची पार्टी म्हणून ‘लव्ह स्टोरी’ नावाचा एक सिनेमा दाखवला. दर दोन मिनिटांनी मी त्यांना समोर काय चाललंय ते सांगत होतो.सिनेमा संपल्यावर त्यांना एका ‘इंडियन’ रेस्टॉरंट’मध्ये ‘व्हिंडालू’ नावाचा एक तिखट पदार्थ खाऊ घातला. रात्री उशिरा आम्ही घरी परतलो.दुसर्या दिवशी मला निघायचं होतं. फार कमी वेळात त्यांनी मला जीव लावला हेाता. मला घरची कमी जाणवू नये याची काळजी घेतली होती.दुसर्या दिवशी मी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला आणि भारतात परतलो ते त्यांच्या कितीतरी आठवणी काळजावर कोरुनच.
यानंतर तीनएक वर्षांनी मी ज्या कंपनीत मुख्य पदावर काम करत होतो तिचं ऑफीस अमेरिकेत बॉस्टनला होतं. पण तिथून न्यूयॉर्क,शिकागो, ऍटलांटा, डिट्राईट आणि लॉस एंजेलिस अशा अनेक ठिकाणी मला सतत फिरावं लागे. माझा मुक्काम पंचतारांकित हॉटेल्समध्येच असे.पण तिथे मला इंग्लंड किंवा युरोपपेक्षा खूपच जास्त काळे लोक दिसले. रस्तोरस्ती, अनेक दुकानात, ट्रेन्समध्ये ते दिसायचे.
पण त्या काळात काळ्यांची प्रचंड दादागिरी आणि गुंडगिरी चालायची. अनेक वर्षांच्या अन्यायानंतर, बेकारीनंतर तिथल्या टपोरी तरुणांना कायकरावं हे कळत नव्हतं. काळ्यांमध्ये गोर्यांच्या अनेक पटीनं बेकारी होती आणि ज्यांना नोकर्या मिळत त्या एकतर खालच्या दर्जाच्याअसायच्या. कुठे बस ड्रायव्हर, कूरियर कंपनीत निरोप्या, सफाई कामगार किंवा मॅकडोनल्डसारख्या हॉटेलमध्ये काउंटरवर काम करणारा अशाचठिकाणी त्यांना नोकर्या असायच्या. कायमस्वरुपी नोकर्यांची हमी कमीच होत चालली होती. शिवाय त्यांना पगारही खूपच कमी असायचा.सीईओ तर सोडाच पण साध्या मॅनेजरच्या जागी कुणीही काळा दिसायचा नाही. मग बरेच काळे तरुण खेळाकडे वळले. फूटबॉल, बॉक्सिंग,बेसबॉल, व्हॉलीबॉल यात नाव आणि पैसा कमवायचं स्वप्न ते तरुण बघायला लागले. न्यूयॉर्क किंवा शिकागोतून फिरताना आपल्याकडे जशीतरुण मुलं गल्लोगल्ली क्रिकेट खेळतात, तशी काळी मुलं हे सगळे खेळ खेळताना मैदानात दिसायची. न्यूयॉर्कच्या ब्रॉंक्समध्येतर चक्करस्त्यावर हे खेळ चालू असायचे. महंमद अली, मायकेल जॉर्डन, मॅजिक जॉन्सन, माईक टायसन अशा काहींनी प्रचंड नाव आणि पैसाकमावल्यामुळे या खेळांचं आकर्षणही वाढलं होतं. संगीत हाही नाव आणि पैसा कमावण्याचा एक मार्ग होता. मायकेल जॅक्सननं तर कोट्यावधीडॉलर्स मिळवले होते. बहुतांशी काळ्यांच्या पदरी हे यश पडलं नसलं तरी यामुळे एक तर स्वप्न बघणं तरी शक्य होत होतं आणि टाईमपासपण करता यायचा.
पण यात यश मिळवणं हेही सगळ्यांना शक्य नसायचं. मग हे समाजातून बाहेर फेकले गेलेले ‘अयशस्वी’ बेकार तरुण हिंसेकडे वळायचे. मलाआठवतंय, १९८० च्या दशकात न्यूयॉर्कमधलं सेंट्रल पार्क खूपच कुप्रसिध्द होतं. हे एक प्रचंड भलंमोठं पार्क आहे. ग्रेहाउंडच्या पोर्ट ऍाथॉरिटीच्यामुख्य बस स्टेशनपासून ते खूपच जवळ होतं. पण रात्री अंधार झाल्यावर त्या पार्कमध्ये कुणी जायला धजावत नसे. कारण तिथे काळ्याआक्रमक तरुणांच्या टोळ्या फिरत असत. तुम्ही त्यांना दिसलात तर ते तुमच्याकडे पैसे मागत. तुम्ही नकार दिलात तर ते चक्क पिस्तूलकाढून कपाळावर रोखत आणि तुम्ही तरीही नकार दिलात तर ते खरोखरंच गोळी मारत. सेंट्रल पार्कविषयी अशा अनेक कथा मी खूप ऐकल्याहोत्या. बरं तुमच्याकडे खरंच पैसे नसतील तर काय? त्यांच्याकडे तुमची झडती घ्यायलाही वेळ नसे. त्यामुळे सरळ गोळीच खावी लागणार.म्हणून सेंट्रल पार्कविषयी एक अलिखीत नियम होता. एकतर अंधार पडल्यावर तिकडे फिरकू नये आणि जर फिरकलातच तर जवळ ४०-५०डॉलर्स ठेवावेत आणि कोणी काळ्यानं ‘मँगिंग’ केलं (बळजबरीनं असे पैसे मागण्याला ‘मगिंग करणं’ म्हणत) तर त्याला ते पैसे सरळ काहीहीप्रश्न न विचारता देऊन टाकावेत. पैसे मिळाल्यावर त्या दिवसाची कमाई मग हे काळे तरुण दारु, ड्रग्ज यावर लगेच खर्च करुन पहाटे लालडोळ्यांनी घरी परतले तर परतत.
एकदा मला बॉस्टनहून न्ययॉर्कला जायचं होतं. पण तिथे जाण्यासाठीचं माझं विमान चुकलं. म्हणून मी ग्रेहाउंड बसनं बॉस्टनहून न्यूयॉर्कलागेलो. वेळ संध्याकाळची होती. प्रवासाला ३-४ तास लागले. एका क्षणाला ती बस एक वळण घेते आणि आपल्यासमोर प्रचंड टोलेजंग अशाडोळ्याचं पारणं फिटेल अशा तर्हेनं मॅनहटनमधल्या गगनचुंबी इमारती आणि त्यांचा झगमगाट क्षणार्धात उभा राहतो आणि त्यावेळी न्यूयॉर्कम्हणजे काय चीज आहे ते लक्षात येतं. शेवटी त्या टोलेजंग इमारतीतून वाट काढत काढत बस शेवटच्या स्थानकावर थांबली. फॅार्टीसेकंडस्ट्रीटच्या ग्रेहाउंडच्या मुख्य बसस्टेशनपाशी मी उतरलो. त्यावेळी रात्रीचे ९-१० वाजले असतील. मला ‘ई’ ट्रेन पकडून क्वीन्सला जायचं होतं. पणमी जरा पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोरच xx आणि xxx सिनेमांच्या पाट्या दिव्याच्या झगमगाटात झळकत होत्या. त्याथिएटरबाहेर अनेक काळे लोक रात्री गॉगल लावून ड्रग्जच्या नशेत चूर होउन कडेला बसले होते किंवा उभे राहून ‘गिव मी ए डाईम (म्हणजे २५सेंट्स)’ किंवा ‘गिव्ह मी ए डॉलर’ असं येणार्या जाणार्याला धमकावणीच्या सुरात विनवत होते. मी कसंबसं त्यांना चुकवत फिरत फिरत सेंट्रलपार्कपाशी येउन धडकलो आणि कुतूहल म्हणून चक्क आत शिरलो. खरंतर मी काही फारसा धीट नाही. पण माझं कुतूहल मला स्वस्थ बसू देतनव्हतं. घाबरतच मी आत शिरलो. १०-१५ मिनिटं चालल्यावर दोन काळीकभिन्न माणसं माझ्याकडे आली आणि त्यांनी माझा प्रत्येकी एक दंडधरला आणि मला पैसे मागितले. मला तोपर्यंत दरदरुन घाम फुटला होता. हे असं होणार याची मला तर कल्पना होतीच. पण तरीही मी आतघुसलो होतो. शेवटी तिथल्या न्यायानं मी चक्क चाळीस डॉलर्स काढून दिले तेव्हा त्यांनी मला सोडलं. बाहेर येऊन तडक ‘ई’ ट्रेन पकडूनक्वीन्सला मित्राच्या घरी रात्री १२ वाजता पोहोचेपर्यंत माझ्या छातीत धडधडत होतं. तो दिवस किंवा ती रात्र मी कधीच विसरु शकलेलो नाही.
न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये त्या काळात काळ्यांची बरीच दहशत होती. एकदा मिड-टाऊन ते डाऊन-टाऊन असा ट्रेनचा काही मिनिटांचाच मीप्रवास करत होतो. वेळ होती दुपारचे दोन. बाहेर तरीही बर्फ पडत होता. पण माझ्या डब्यात कोणीच नव्हतं. एका स्टेशनवर दोन धिप्पाड काळीमाणसं आली. आणि पूर्ण डबा रिकामा असताना माझ्याच दोन्ही बाजूला एक एक करुन ते बसले. त्यांनीही गॉगल्स लावले होते; कानालावॉकमन एवढ्या जोरात लावला होता की दोघांचं संगीत मला ऐकू येत होतं. दोघेही च्युईंग गम चघळत माझ्याकडे बघत हसत होते. पुन्हाआपण किती भित्रे आहोत याचा मला प्रत्यय आला. बाहेर बर्फ पडत असतानाही मला दरदरुन घाम फुटला होता. मी कसाबसा अंग चोरुनबसलो होतो. पुढचं स्टेशन आलं. डब्याचे दरवाजे उघडले गेले. मी चक्क जीव मुठीत घेऊन सुसाट सुटून प्लॅटफॉर्मवर आलो. जरा दम घेतलाआणि पुढची गाडी पकडून पुढे गेलो. असे अनेक प्रसंग आले.
हे सगळे अनुभव काळ्या लोकांविषयी वाचलेल्या अन्यायाविरुध्दच्या मानवतावादी चळवळींपेक्षा वेगळेच होते. शिवाय इंग्लंडमध्ये आलेल्याअनुभवांपेक्षाही वेगळे होते. मग हे काळे लोक असे का झाले असावेत? याचा शोध चालू झाला. मग मी त्यावर खूप वाचलं. त्यांच्यापरिस्थितीविषयी वाचलं. आणि त्यांना समजावून घेण्यासाठी मी ब्रँक्समध्ये जाऊन अनेक संध्याकाळी घालवल्या. कित्येकदा पंचतारांकितहॉटेल्स सोडून तिथल्याच कुठल्याशा हॉटेलमध्ये रहा, तिथल्या लोकांशी बोल असे प्रकार सुरु केले. सुरुवातीला प्रचंड भीती वाटली. पण नंतरतिथेही काही मित्र झाले. मग त्यांच्या घरीही बरेच वेळेला गेलो. त्या अनेक कुटुंबांचा इतिहास, पार्श्वभूमी, त्यांचे उद्योगधंदे, बेकारी, ड्रग्ज आणिदारुची व्यसनं, त्यांचं संगीत आणि क्रीडाप्रेम, त्यांची हिंसा, घरी चालणारी शिवीगाळ हे सगळं सगळं खूप जवळून बघितलं. हे सगळं बघतानामाझं मन खूप विषण्ण व्हायचं. ते असे का वागतात याचं तात्कालिक कारण कळत होतं, पण अजून खोलवर जायची गरज होती.
कित्येकवेळा खूप झकासही अनुभव येत. एकदा मी सिनसिनाटीला एका मीटिंगसाठी गेलो होतो. परत येताना टॅक्सीत बसून विमानतळाकडेनिघालो. अशा कुठल्याही प्रवासात अनेकांशी काहीतरी गप्पा मारुन एकूण तो प्रदेश, माणसं, संस्कृती याविषयीचं आपलं ज्ञान आणि इनसाईटवाढते असं माझं मत आहे. एकूणच टिपिकल टूरिस्ट लोकांप्रमाणे आता डावीकडे बघा, ती उंच इमारत दिसेल; उजवीकडे बघा, तो प्रसिध्द पुतळादिसेल वगैरे गोष्टींमध्ये मला फारसा रस नसतो. म्हणजे भव्यदिव्य म्हणून मी नायगारा धबधबाही दोनतीनदा बघितलाय, पण त्यापेक्षा मानवीस्वभावातल्या कंगोर्यांचा, त्यातल्या संस्कृतीच्या इतिहासाचा आणि त्यातल्या माणुसकीचा धबधबा आपण जेव्हा बघतो आणि त्यात जेव्हाआपण नहातो तेव्हाच तो देश आपण खर्या अर्थानं बघतो असं मला वाटतं.
‘ट्वेंटी लॅटिन अमेरिकाज’ अशा कुठल्याशा शीर्षकाचं दोन भागातलं एक सुंदर पुस्तक आहे. खरंतर ते प्रवासवर्णन आहे. दक्षिण किंवा लॅटिनअमेरिकेतल्या वीस देशांविषयी त्यात सखोल प्रवासवर्णनं आहेत. पण त्यात ‘सकाळी सात वाजता उठलो, आठला त्याच गावातल्या काकूंनीकेलेले पोहे खाल्ले आणि १० वाजता तो टॉवर बघितला’ अशी फुसकी, तीच ती प्रवासवर्णनं नसून त्या त्या देशातल्या लोकांशी भिडून, त्याच्याइतिहासात डोकावून, त्या संस्कृतीकडे माणुसकीनं बघून त्यातल्या वेगवेगळ्या थरातल्या लोकांविषयी त्यात लिहिलं होतं. ते मनाला खूपचभिडणारं होतं. मराठीत तसं भिडणारं पुस्तकं म्हणजे मुंबईविषयी लिहिलेलं ‘अर्धी मुंबई’ हे युनिक फिचर्सचं एक ग्रेट पुस्तक. मला अशातर्हेनं देश बघायला आवडतो. प्रत्येक देश मी असाच बघायचा प्रयत्न केला. अमेरिकेतही ब्लॅक्स, प्युटोर रिकन्स, मेक्सिकन्स या लोकांमध्येजाऊन, मिसळून त्यांची संस्कृती, मनोवृत्ती आणि इतिहास समजून घेण्यात धमाल आली. म्हणजे ते सगळं पूर्णपणे कळलं असं म्हणता येणारनाही, पण थोडंतरी ते समजलं.
तर सांगत होतो की एकदा मी सिनसिनाटीहून टॅक्सीतून एअरपोर्टकडे निघालो होतो. त्या ब्लॅक टॅक्सीचालकाशी बोलायला लागलो. एअरपोर्टवरचाड्राईव्ह एक तासाचा होता. मग खूप गप्पा झाल्या. मुलं किती, काय करतात, का शिकत नाहीत वगैरे. त्याच्या एका मुलाला मायकेलजॅक्सनसारखं संगीतकार व्हायचं होतं. मग संगीतावर गप्पा चालू झाल्या. माझ्याकडे एक मराठी गाण्यांची कॅसेट होती. (त्याकाळी सीडीजनुकत्याच आल्या होत्या) मी त्याला ती ऐकण्याविषयी विचारलं. तो तयार झाला. मग मी ती गाणी लावली! ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘घट डोईवर,घट कमरेवर’ अशा तर्हेची ती गाणी होती. मी एका संशोधकाच्या नजरेनं प्रत्येक गाण्याच्या वेळी त्याच्या चेहर्यावरचे भाव टिपत होतो. त्यालात्याचा अर्थ कळत नव्हता पण गाण्याचे सूर कुठेतरी त्याच्यापर्यंत पोहोचत असावेत. तो त्याच्याही नकळत गाण्याला दाद देत होता. अमेरिकनपध्दतीप्रमाणे प्रत्येक गाण्याला उगीचच तो ‘ग्रेट’ म्हणत होता. जात, धर्म, देश, वर्ण या सगळ्यांना भेदून माणसाला संगीत एकत्र कसं आणूशकतं याचं ते प्रत्यंतर होतं!
त्यावेळी एअरपोर्टवर आल्यावर भाडं देऊन मी निघालो. आणि त्या गडबडीत तो ती कॅसेट गाडीतल्या टेपरेकॉर्डरमधून काढून मला द्यायलाविसरला. मी एअरपोर्टमध्ये शिरलो आणि माझ्या लक्षात आलं. आता मधले अनेक तास आपल्याला वॉकमनवर काहीच ऐकता येणार नाही याकल्पनेनं मी उदास झालो. मी टॅक्सी तर जाताना बघत होतो. आता काय करणार? मी सामान घेऊन एअरपोर्टच्या बाहेर येऊन चाळीस मिनिटंउभा राहिलो. आणि आश्चर्य म्हणजे थोड्या वेळानं तो टॅक्सीवाला चालक परत येत होता. तो माझ्यासमोर येऊन धडकला आणि ‘माय फ्रेंडयुवर कॅसेट’ म्हणून कॅसेट माझ्या हातात ठेवून चालता झाला. मी त्याच्या प्रामाणिकपणाकडे थक्क होऊन बघतच राहिलो! आणि मुख्य म्हणजेचाळीस मिनिटं पुन्हा टॅक्सी चालवत दुसर्या भाड्याची पर्वा न करता स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करुन केवळ माझी कॅसेट परत करण्यासाठीतो आला होता. त्यात त्या कॅसेटच्या किंमतीपेक्षा त्यातल्या गाण्यांचं त्यावेळी मला किती महत्व होतं ते तो पूर्णपणे जाणून होता!
१९९०च्या आणि २०००च्या दशकात बरेच बदल घडले. रुडॉल्फ ज्युलियानी न्यूयॉर्कचा मेयर बनला. त्यानं खूप कडक नियम केले आणिकाळ्यांचे ड्रग्जचे आणि गुंडगिरीचे न्यूयॉर्कमधले अड्डे नष्ट केले. इतरही काही शहरात असंच घडलं. पूर्वी डीट्रॉईटला सिटीसेंटरमध्ये खूपभीतीदायक वातावरण असे. ते आता कमी झालं. ब्रिजपोर्ट हे शहर तर एकेकाळचं प्रचंड भयानक आणि काळ्या दादागिरीचं. जनरल इलेक्ट्रिकबरोबरच्या कामानिमित्त मला तिथे जावं लागे. ब्रिजपोर्टमध्येही थोडेफार बदल घडत होते. गोर्यांच्या दृष्टीनं जरी आता सुरक्षितता वाढलीअसली तरी काळ्यांवर प्रचंड दडपशाही चाललेली होती. याचं कारण त्यांच्यातली बेकारी आणि दारिद्य्र ही मूळं कारणं काही नष्ट होत नव्हती.उलट मुक्त बाजारपेठेच्या निओलिबरल समाजव्यवस्थेमध्ये ही गरीब-श्रीमंत दरी प्रचंड वाढली. कट्रिनाच्या वादळाच्या-संकटाच्या वेळी त्यांचीखरी-स्थिती काय होती आणि बुश सरकारनं त्यांना कशी मदत केली नाही हेही सगळ्या जगानं बघितलं.
या सगळ आयआयटीत असताना आयुष्यानं एक वेगळंच वळण घेतलं आणि आमच्या गटातले अनेकजण इतिहास, तत्वज्ञान, साहित्य, संगीत, विज्ञानआणि अर्थशास्त्र या सगळ्यात प्रचंड रस घेऊन वाचन, चर्चा करायला लागले. त्यावेळी अमेरिकेतल्या इतिहासावर चर्चा चाले. त्यात मग ब्लॅकचळवळ, ब्लॅक पँथर वगैरेंवर रात्र-रात्र वादचर्चा चालत. मार्टिन ल्यूथर किंग, रोझा पार्क्स, अँजेला डेव्हिस यांच्याविषयी आणि त्यांच्याविचारांविषयी आणि चळवळींविषयी आम्ही वाचत आणि बोलत असू. त्यातलं काय बरोबर आणि काय चूक हाही आमच्या जिव्हाळ्याचा विषयझाला होता. ब्लॅक पँथरकडून स्फूर्ती घेऊन दलित पँथरची चळवळ उभी राहिली होती. यामुळे ब्लॅक पँथर आणि एकूणच काळ्या चळवळीला एक वेगळा संदर्भप्राप्त होत होता. व्हिएतनाम युद्धाविरोधाचा चळवळ, हिप्पी संस्कृती, बीट संगीत आणि विद्यार्थ्यांचा संघर्ष या सगळ्यांबरोबरच काळ्यांचाचळवळ ही प्रस्थापितांविरुद्धची एक चळवळ होती. त्यात खूपच हिंसा होती. ती जरी मला मान्य नसली तरी एकंदरीत त्या चळवळीबरेाबर खूपचभावनिक जवळीक निर्माण झाली होती हे मात्र खरं. पण त्या काळी ते सगळं पुस्तकी होतं. बरंचसं रोमँटिसिझममधून आलेलं होतं हे आजजाणवतंय. पण यामुळे एरव्ही कधीच कळलं नसतं अशा एका अस्वस्थ जगाचं दालन मला खुलं झालं होतं. यानंतर आदिवासी चळवळ, त्यातून परतून इन्फर्मशन टेक्नॉलॉजीत काम करायला लागणं हे सगळं घडलं होतं. यानंतर पुन्हा एकदा ब्लॅकसंस्कृतीशी माझा संबंध येणार हेाता. ते १९८१चं वर्ष असावं. सॉफ्टवेअरच्या एका कामासाठी मी अनेक महिने इंग्लंडला राहिलो होतो. पूर्वीसिंगापूर, मलेशिया इथे गेलेलो असलो तरी पाश्चिमात्य राष्ट्रात ते माझं पहिलंच पाऊल होतं. तिथे मी एक ईआरपी पॅकेज लिहिण्याकरता गेलोहोतो. आज एसएपी, ओरॅकल अशा पॅकेजेसची नावं आपण सर्रास ऐकतो. पण त्याकाळी तशी पॅकेजेस बाजारात नव्हतीच. अशी नवी गोष्ट चक्कनिर्माण करायची म्हणजे मनात एक थ्रिल होतंच. विमानानं लंडनला पोहोचल्यावर पुढे ट्रेननं लीड्जला जायचं होतं. ट्रेनमध्ये माझ्या डब्यात इतर बहुतांशी गोर्या मंडळींबरेाबर काही भारतीयआणि पाकिस्तानी मंडळी होती. ब्रिटिश मंडळी या सगळ्यांनाच ‘पाकी’ म्हणत. लीड्जजवळ ब्रॅडफर्ड नावाचं एक ठिकाण आहे. तिथे काही भारतीयआणि बरीचशी पाकिस्तानी अशी आशियाई मंडळी राहायची. अजूनही रहातात. गाडी सुटायच्या वेळेपर्यंत डब्यात काही काळी मंडळीही चढली.दिसायला ती धिप्पाड होती आणि जरा विचित्रच होती. तशी हॉलिवूडच्या सिनेमात मी काळी मंडळी बघितली नव्हती असं नाही. ‘टू सर विथ लव्ह’ हा सिडनी पॉयस्चरचा सिनेमा तर मला खूपचआवडला होता. त्या सिनेमात एक काळा शिक्षक एका शाळेत नव्यानंच रुजू होतो. वर्णामुळे त्याला नोकरी मिळायला खूप अडचणी आलेल्याअसतात. या नव्या शाळेत तिथे भरपूर गोरी मुलं आणि त्यांच्याबरोबर एकच काळा मुलगा असे शिकायला असतात. गोर्या मुलांच्यादांडगटपणाला सगळे घाबरुनच गेलेले असतात. खूप व्रात्यपणा करुनही तो नवा काळा शिक्षक आपला संयम सोडत नाही. काही काळानं त्याशिक्षकाचं मुलांशी छान जमायला लागतं. पण काही प्रसंगांमुळे त्यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण होतो. त्याच वेळी वर्गातल्या एकमेव काळ्यामुलाची आई वारते. इतर मुलं तिच्या अंत्ययात्रेला जायचं का नाही यावरुन गोंधळून जातात. अनेक नाट्यमय प्रसंगांनंतर तो शिक्षक आणित्याचे सगळे विद्यार्थी त्या अंत्ययात्रेत भेटतात, आणि त्यांच्यातला दुरावा संपुष्टात येतो अशा तर्हेची या चित्रपटाची गोष्ट होती. हॉलीवूडमधल्या सिनेमातली कित्येक काळी मंडळी खूप प्रेमळ असायची. पण ही गाडीत चढलेली मंडळी मात्र तशी दिसत नव्हती. लीड्जयेईपर्यंत ती स्वतःशी काही बोलत बसली होती. भाषा जरी इंग्रजी असली तरी त्यांचे बोलण्याचे हेल आणि पद्धत वेगळी होती. पूर्वीच्या काळीमी काळ्या चळवळींविषयी आणि ब्लॅक पँथरविषयी बरंच वाचन केलं होतं. त्यामुळे ही मंडळी इथे का आणि कशी आली याची बर्यापैकीऐतिहासिक जाणीव मला होतीच. पण ते सगळं ज्ञान पुस्तकी होतं. प्रत्यक्ष त्यांना आता काय वाटत असेल? ते कसे रहात असतील? याबद्दलमनात बर्यापैकी कुतूहल होतंच. त्यामुळे याविषयी विचार करता करता लीड्ज केव्हा आलं ते कळलंच नाही. इंग्लंडच्या वास्तव्यात माझ्याकडे वॉक्सॉल गाडी होती. त्यातून आम्ही वर्डस्वर्थच्यामुळे प्रसिध्द असलेलं ‘लेक डिस्ट्रिक्ट’ आणि ऑलिव्हरगोल्डस्मिथच्या ‘व्हिकार ऑफ वेकफील्ड’ मुळे प्रसिध्द झालेलं वेकफील्ड यासारख्या यॉर्कशायरमधल्या अनेक ठिकाणी मनसोक्त भटकायचो.भटकतानाही काळी माणसं दिसायची. पण ती फारशी श्रीमंत नसावीत. ती फारशी चैन करताना दिसायची नाहीत. कुठेतरी वेटर किंवा कुठेतरीमदतनीस अशीच कामं ती करायची. ऑफिसमध्येही मॅनेजर सोडाच पण साधे प्रोग्रॅमर्सही कुणी काळी मंडळी नव्हती. मग एका बाजूनं आता तरगुलामगिरी संपलेली असताना अशी का परिस्थिती होती? एवढी विषमता का अजून आहे? या सगळ्यांविषयी माझ्या मनात सतत विचार येत. त्या काळात बीबीसीवर अनेक चांगले कार्यक्रम लागत. इंग्रजी विनोदबुद्धी मला खूप आवडायची. आज सीएनएनप्रमाणेच बीबीसी म्हणजे एकअधिकृत सरकारी किंवा बड्या उद्योगांनी चालवलेला चॅनेल वाटतो, तसा त्याकाळी अजून झाला नव्हता. रीगन/थँचर यांच्या अतिउजव्याराजकारणानं अजून जनमानसाचा कब्जा मिळवला नव्हता. एकदा चॅनेल बदलताना एका चॅनेलवर ‘दी रुट्स’ नावाची एक मालिका चालली होती.सर्व काळ्यांच्या इतिहासावर रंगवलेली भयानक पण खिळवून टाकणारी अशी ती मालिका होती. सर्वप्रथम काळ्या लोकांना आफ्रिकेतून कसंपकडून युरोप/अमेरिकेत आणलं गेलं, आणताना बोटींवर कसे त्यांचे प्रचंड हाल झाले, त्यात बरेचसे कसे मेले, अनेकांची ताटातूट कशी झालीआणि नंतर त्यांना गुलाम म्हणून मळ्यांवर कसं ठेवलं, त्यांना कशी अतिभयानक, अंगावर काटा येईल अशी वागणूक मिळत असे,त्यांच्यातल्या पिढ्यानपिढ्या अनेक दशकं/शतकं त्यांनी गुलामगिरी कशी सहन केली, त्यांच्यात बंडाची ठिणगी कशी पेटली, त्यांच्या संघटना कशाउभ्या राहिल्या आणि शेवटी त्यांना मर्यादित का होईना पण स्वातंत्र्य कसं मिळालं याविषयी या मालिकेत चित्र रंगवलं होतं. ऍलेक्स हॅलीच्या ‘दीरुट्स’ या कादंबरीवरुन ही मालिका निर्माण केली हेाती. आजवर जगातल्या कानाकोपर्यात या कादंबरीच्या किमान २० लाख प्रती विकल्यागेल्या आहेत. २४ भाषांमध्ये तिचे अनुवाद करण्यात आले आहेत. या कादंबरीच्या प्रकाशनाच्या काळात अमेरिकेमधल्या काळ्या लोकांचा संघर्षबर्यापैकी संपून त्याची जागा आशावादानं घेतली होती. तिचे पडसाद हॅलीच्या लिखाणात आढळतात. २०० वर्षांचा काळ व्यापणारी ही कादंबरीआहे. १७५० साली जन्मलेल्या कुंटा किंटे नावाच्या एका अमेरिकन मुलाच्या आयुष्याच्या कहाणीपासून सुरु होऊन नंतरच्या अनेक पिढ्यांचंचित्रण यात आहे. ही मालिका बघताना असं वाटलं, प्रत्यक्ष काळ्या लोकांना हे सगळं बघताना काय वाटत असेल? प्रचंड अपमान आणि अन्याय यांची मनातउजळणी होत असताना अंगाची लाहीलाही तर होत नसेल? आणि प्रत्यक्षात झालं तसंच. ही मालिका चालू असताना काळ्यांनी इंग्लंडभर दंगलीकेल्या. प्रचंड जाळपोळ झाली. अनेकांना अटक झाली. टीव्हीवर आणि पेपरात त्याच्याच बातम्या यायच्या. लीड्ज शहरात त्याकाळी बर्यापैकीदहशत पसरली होती. लीड्जपासून जवळ असलेल्या स्कोल नावाच्या लहान खेड्यात आम्ही रहात असू. तिथे बहुतांशी गोरेच रहायचे. गावातल्यापबमध्ये सगळे संध्याकाळी जमायचे. तिथले अनेक गोरेही आता माझे मित्र झाले होते. पावणेअकराला पब बंद हेात असे. तो संपेपर्यंत मीबरेचदा तिथे असे. त्या काळात तिथे याविषयी खूप चर्वणचर्चा चाले. खरंतर इंग्लिश पब म्हणजे एक गंमतशीर ठिकाण. इथे हास्याचे फवारेसतत उडत असतात आणि राजकारणावर शक्यतोवर चर्चा होत नाही. पण हा विषय त्याकाळी खूपच गाजला होता. ही दंगल बरेच दिवस चालली आणि शेवटी शमली. काळे आणि गोरे यांच्यात अजून इतका फरक होता की काळा मुलगा आणि गोरी मुलगीकिंवा काळी मुलगी आणि गोरा मुलगा यांच्यात प्रेम किंवा लग्न या गोष्टी फारशा होताना दिसतच नव्हत्या. अजूनही त्या फारश्या दिसतनाहीत. याचं कारण रंगभेद तर आहेच पण त्याबरोबर संस्कृतीही आहे. काळ्यांची भाषा, आवडीनिवडी, रहाण्याची पध्दत ही पूर्णपणे वेगळीअसल्यानं आणि गोरे त्या जगण्याच्या पद्धतीला अजून बर्याच वेळा मनातल्या मनात आणि काही वेळा उघडपणे ‘खालचं’ समजत असल्यामुळेअसं होत होतं हे मला समजत होतं. तरीही लीड्जला सिटी-सेंटरपाशी एक काळा मुलगा आणि एक गोरी मुलगी नेहमी हातात हात घालूनजायचे. कदाचित दोघंही जवळच्याच कुठल्याशा ऑफिसमध्ये काम करत असावेत. लंडनलाही मी बरेचदा जात असे. तिथेही अशी दृश्यं दिसतपण तीही खूपच क्वचित. तिथेही एक-दोनदा काळी मुलगी आणि गोरा मुलगा यांच्या जोड्या पाहिल्या होत्या. हे कसे रहात असतील? याविषयीमाझ्या मनात कुतूहल खूपच वाढलं होतं. इंग्लंडमधले महिने भराभर उलटले. शेवटी इंग्लडहून परतायला एकच महिना राहिला होता. मला घर बदलायचं होतं. मग मी मनाचा हिय्याकरुन तो महिना एका काळ्या कुटुंबात काढायचा ठरवला. ‘पेईंग गेस्ट’ सारखी एक जाहिरात मी बघितली आणि त्यांना भेटायला गेलो. शहराच्यासिटीसेंटरजवळच एका अत्यंत लहान घरात एक काळं जोडपं रहात होतं. त्यांना एक मुलगा होता. तो बराच टपोरी होता. त्यानं शिक्षण अर्धवटचसोडलं होतं. मी त्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहायचं ठरवलं. त्या घरातले आई-वडील जवळच एक बारीकसं टपरीवजा हॉटेल चालवायचे. मीसकाळी तिकडेच नाश्त्याला जायचो. दिसायला ओबडधोबड आणि वरकरणी असंस्कृत वाटणार्या त्या जोडप्याकडे माणुसकी मात्र खूप होती हे मीतिथे रहायला गेल्यावर माझ्या लक्षात आलं. एकदा तर मला जखम झाली, तर त्यांनीच दोन तीन दिवस माझी काळजी घेतली. मला बँडेजलावायचे, घरी चहा करुन द्यायचे. आणि त्याचे पैसे लावणार नाही असं पुन्हा हसून सांगायचे. या प्रसंगानं मी मग त्यांच्या घरातलाच एकझालो होतो. संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर मीही कित्येक संध्याकाळी त्यांच्या हॉटेलवर त्यांच्या मदतीला जात असे. तिथे येणारीगिर्हाईकंही बहुधा काळी मंडळी विंवा क्वचित आशियाई मंडळी असायची. मग खाता खाता ती काळी मंडळी बर्याच गप्पा मारायची.कित्येकदा त्यात एकमेकांची दुःखं समजावून घेणं असे; तर कित्येकदा गोर्यांविषयीचा सुप्त राग असे. नुकत्याच दंगली होऊन गेल्यामुळेत्याविषयी चर्चा चालेच. प्रथम माझ्याकडे बघत ते दबकत बोलत. पण मग काही दिवसात मी त्यांना त्यांच्यातलाच वाटायला लागलो. मग तेखुलायचे. त्यांच्या संस्कृतीचं, रहाण्याच्या, वागण्याच्या, खाण्याच्या आणि बोलण्याच्या पध्दतीचं मला खूप जवळून दर्शन होत होतं. पण तरीहीअजून कुतूहल होतंच. तो एक महिना कसा गेला ते कळलंच नाही. ब्रॅडफर्डला एका थिएटरमध्ये चक्क हिंदी सिनेमे चालत. त्या काळ्या कुटुंबाला मी माझ्यातर्फेजाण्याची पार्टी म्हणून ‘लव्ह स्टोरी’ नावाचा एक सिनेमा दाखवला. दर दोन मिनिटांनी मी त्यांना समोर काय चाललंय ते सांगत होतो.सिनेमा संपल्यावर त्यांना एका ‘इंडियन’ रेस्टॉरंट’मध्ये ‘व्हिंडालू’ नावाचा एक तिखट पदार्थ खाऊ घातला. रात्री उशिरा आम्ही घरी परतलो.दुसर्या दिवशी मला निघायचं होतं. फार कमी वेळात त्यांनी मला जीव लावला हेाता. मला घरची कमी जाणवू नये याची काळजी घेतली होती.दुसर्या दिवशी मी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला आणि भारतात परतलो ते त्यांच्या कितीतरी आठवणी काळजावर कोरुनच. यानंतर तीनएक वर्षांनी मी ज्या कंपनीत मुख्य पदावर काम करत होतो तिचं ऑफीस अमेरिकेत बॉस्टनला होतं. पण तिथून न्यूयॉर्क,शिकागो, ऍटलांटा, डिट्राईट आणि लॉस एंजेलिस अशा अनेक ठिकाणी मला सतत फिरावं लागे. माझा मुक्काम पंचतारांकित हॉटेल्समध्येच असे.पण तिथे मला इंग्लंड किंवा युरोपपेक्षा खूपच जास्त काळे लोक दिसले. रस्तोरस्ती, अनेक दुकानात, ट्रेन्समध्ये ते दिसायचे. पण त्या काळात काळ्यांची प्रचंड दादागिरी आणि गुंडगिरी चालायची. अनेक वर्षांच्या अन्यायानंतर, बेकारीनंतर तिथल्या टपोरी तरुणांना कायकरावं हे कळत नव्हतं. काळ्यांमध्ये गोर्यांच्या अनेक पटीनं बेकारी होती आणि ज्यांना नोकर्या मिळत त्या एकतर खालच्या दर्जाच्याअसायच्या. कुठे बस ड्रायव्हर, कूरियर कंपनीत निरोप्या, सफाई कामगार किंवा मॅकडोनल्डसारख्या हॉटेलमध्ये काउंटरवर काम करणारा अशाचठिकाणी त्यांना नोकर्या असायच्या. कायमस्वरुपी नोकर्यांची हमी कमीच होत चालली होती. शिवाय त्यांना पगारही खूपच कमी असायचा.सीईओ तर सोडाच पण साध्या मॅनेजरच्या जागी कुणीही काळा दिसायचा नाही. मग बरेच काळे तरुण खेळाकडे वळले. फूटबॉल, बॉक्सिंग,बेसबॉल, व्हॉलीबॉल यात नाव आणि पैसा कमवायचं स्वप्न ते तरुण बघायला लागले. न्यूयॉर्क किंवा शिकागोतून फिरताना आपल्याकडे जशीतरुण मुलं गल्लोगल्ली क्रिकेट खेळतात, तशी काळी मुलं हे सगळे खेळ खेळताना मैदानात दिसायची. न्यूयॉर्कच्या ब्रॉंक्समध्येतर चक्करस्त्यावर हे खेळ चालू असायचे. महंमद अली, मायकेल जॉर्डन, मॅजिक जॉन्सन, माईक टायसन अशा काहींनी प्रचंड नाव आणि पैसाकमावल्यामुळे या खेळांचं आकर्षणही वाढलं होतं. संगीत हाही नाव आणि पैसा कमावण्याचा एक मार्ग होता. मायकेल जॅक्सननं तर कोट्यावधीडॉलर्स मिळवले होते. बहुतांशी काळ्यांच्या पदरी हे यश पडलं नसलं तरी यामुळे एक तर स्वप्न बघणं तरी शक्य होत होतं आणि टाईमपासपण करता यायचा. पण यात यश मिळवणं हेही सगळ्यांना शक्य नसायचं. मग हे समाजातून बाहेर फेकले गेलेले ‘अयशस्वी’ बेकार तरुण हिंसेकडे वळायचे. मलाआठवतंय, १९८० च्या दशकात न्यूयॉर्कमधलं सेंट्रल पार्क खूपच कुप्रसिध्द होतं. हे एक प्रचंड भलंमोठं पार्क आहे. ग्रेहाउंडच्या पोर्ट ऍाथॉरिटीच्यामुख्य बस स्टेशनपासून ते खूपच जवळ होतं. पण रात्री अंधार झाल्यावर त्या पार्कमध्ये कुणी जायला धजावत नसे. कारण तिथे काळ्याआक्रमक तरुणांच्या टोळ्या फिरत असत. तुम्ही त्यांना दिसलात तर ते तुमच्याकडे पैसे मागत. तुम्ही नकार दिलात तर ते चक्क पिस्तूलकाढून कपाळावर रोखत आणि तुम्ही तरीही नकार दिलात तर ते खरोखरंच गोळी मारत. सेंट्रल पार्कविषयी अशा अनेक कथा मी खूप ऐकल्याहोत्या. बरं तुमच्याकडे खरंच पैसे नसतील तर काय? त्यांच्याकडे तुमची झडती घ्यायलाही वेळ नसे. त्यामुळे सरळ गोळीच खावी लागणार.म्हणून सेंट्रल पार्कविषयी एक अलिखीत नियम होता. एकतर अंधार पडल्यावर तिकडे फिरकू नये आणि जर फिरकलातच तर जवळ ४०-५०डॉलर्स ठेवावेत आणि कोणी काळ्यानं ‘मँगिंग’ केलं (बळजबरीनं असे पैसे मागण्याला ‘मगिंग करणं’ म्हणत) तर त्याला ते पैसे सरळ काहीहीप्रश्न न विचारता देऊन टाकावेत. पैसे मिळाल्यावर त्या दिवसाची कमाई मग हे काळे तरुण दारु, ड्रग्ज यावर लगेच खर्च करुन पहाटे लालडोळ्यांनी घरी परतले तर परतत. एकदा मला बॉस्टनहून न्ययॉर्कला जायचं होतं. पण तिथे जाण्यासाठीचं माझं विमान चुकलं. म्हणून मी ग्रेहाउंड बसनं बॉस्टनहून न्यूयॉर्कलागेलो. वेळ संध्याकाळची होती. प्रवासाला ३-४ तास लागले. एका क्षणाला ती बस एक वळण घेते आणि आपल्यासमोर प्रचंड टोलेजंग अशाडोळ्याचं पारणं फिटेल अशा तर्हेनं मॅनहटनमधल्या गगनचुंबी इमारती आणि त्यांचा झगमगाट क्षणार्धात उभा राहतो आणि त्यावेळी न्यूयॉर्कम्हणजे काय चीज आहे ते लक्षात येतं. शेवटी त्या टोलेजंग इमारतीतून वाट काढत काढत बस शेवटच्या स्थानकावर थांबली. फॅार्टीसेकंडस्ट्रीटच्या ग्रेहाउंडच्या मुख्य बसस्टेशनपाशी मी उतरलो. त्यावेळी रात्रीचे ९-१० वाजले असतील. मला ‘ई’ ट्रेन पकडून क्वीन्सला जायचं होतं. पणमी जरा पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोरच xx आणि xxx सिनेमांच्या पाट्या दिव्याच्या झगमगाटात झळकत होत्या. त्याथिएटरबाहेर अनेक काळे लोक रात्री गॉगल लावून ड्रग्जच्या नशेत चूर होउन कडेला बसले होते किंवा उभे राहून ‘गिव मी ए डाईम (म्हणजे २५सेंट्स)’ किंवा ‘गिव्ह मी ए डॉलर’ असं येणार्या जाणार्याला धमकावणीच्या सुरात विनवत होते. मी कसंबसं त्यांना चुकवत फिरत फिरत सेंट्रलपार्कपाशी येउन धडकलो आणि कुतूहल म्हणून चक्क आत शिरलो. खरंतर मी काही फारसा धीट नाही. पण माझं कुतूहल मला स्वस्थ बसू देतनव्हतं. घाबरतच मी आत शिरलो. १०-१५ मिनिटं चालल्यावर दोन काळीकभिन्न माणसं माझ्याकडे आली आणि त्यांनी माझा प्रत्येकी एक दंडधरला आणि मला पैसे मागितले. मला तोपर्यंत दरदरुन घाम फुटला होता. हे असं होणार याची मला तर कल्पना होतीच. पण तरीही मी आतघुसलो होतो. शेवटी तिथल्या न्यायानं मी चक्क चाळीस डॉलर्स काढून दिले तेव्हा त्यांनी मला सोडलं. बाहेर येऊन तडक ‘ई’ ट्रेन पकडूनक्वीन्सला मित्राच्या घरी रात्री १२ वाजता पोहोचेपर्यंत माझ्या छातीत धडधडत होतं. तो दिवस किंवा ती रात्र मी कधीच विसरु शकलेलो नाही. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये त्या काळात काळ्यांची बरीच दहशत होती. एकदा मिड-टाऊन ते डाऊन-टाऊन असा ट्रेनचा काही मिनिटांचाच मीप्रवास करत होतो. वेळ होती दुपारचे दोन. बाहेर तरीही बर्फ पडत होता. पण माझ्या डब्यात कोणीच नव्हतं. एका स्टेशनवर दोन धिप्पाड काळीमाणसं आली. आणि पूर्ण डबा रिकामा असताना माझ्याच दोन्ही बाजूला एक एक करुन ते बसले. त्यांनीही गॉगल्स लावले होते; कानालावॉकमन एवढ्या जोरात लावला होता की दोघांचं संगीत मला ऐकू येत होतं. दोघेही च्युईंग गम चघळत माझ्याकडे बघत हसत होते. पुन्हाआपण किती भित्रे आहोत याचा मला प्रत्यय आला. बाहेर बर्फ पडत असतानाही मला दरदरुन घाम फुटला होता. मी कसाबसा अंग चोरुनबसलो होतो. पुढचं स्टेशन आलं. डब्याचे दरवाजे उघडले गेले. मी चक्क जीव मुठीत घेऊन सुसाट सुटून प्लॅटफॉर्मवर आलो. जरा दम घेतलाआणि पुढची गाडी पकडून पुढे गेलो. असे अनेक प्रसंग आले. हे सगळे अनुभव काळ्या लोकांविषयी वाचलेल्या अन्यायाविरुध्दच्या मानवतावादी चळवळींपेक्षा वेगळेच होते. शिवाय इंग्लंडमध्ये आलेल्याअनुभवांपेक्षाही वेगळे होते. मग हे काळे लोक असे का झाले असावेत? याचा शोध चालू झाला. मग मी त्यावर खूप वाचलं. त्यांच्यापरिस्थितीविषयी वाचलं. आणि त्यांना समजावून घेण्यासाठी मी ब्रँक्समध्ये जाऊन अनेक संध्याकाळी घालवल्या. कित्येकदा पंचतारांकितहॉटेल्स सोडून तिथल्याच कुठल्याशा हॉटेलमध्ये रहा, तिथल्या लोकांशी बोल असे प्रकार सुरु केले. सुरुवातीला प्रचंड भीती वाटली. पण नंतरतिथेही काही मित्र झाले. मग त्यांच्या घरीही बरेच वेळेला गेलो. त्या अनेक कुटुंबांचा इतिहास, पार्श्वभूमी, त्यांचे उद्योगधंदे, बेकारी, ड्रग्ज आणिदारुची व्यसनं, त्यांचं संगीत आणि क्रीडाप्रेम, त्यांची हिंसा, घरी चालणारी शिवीगाळ हे सगळं सगळं खूप जवळून बघितलं. हे सगळं बघतानामाझं मन खूप विषण्ण व्हायचं. ते असे का वागतात याचं तात्कालिक कारण कळत होतं, पण अजून खोलवर जायची गरज होती. कित्येकवेळा खूप झकासही अनुभव येत. एकदा मी सिनसिनाटीला एका मीटिंगसाठी गेलो होतो. परत येताना टॅक्सीत बसून विमानतळाकडेनिघालो. अशा कुठल्याही प्रवासात अनेकांशी काहीतरी गप्पा मारुन एकूण तो प्रदेश, माणसं, संस्कृती याविषयीचं आपलं ज्ञान आणि इनसाईटवाढते असं माझं मत आहे. एकूणच टिपिकल टूरिस्ट लोकांप्रमाणे आता डावीकडे बघा, ती उंच इमारत दिसेल; उजवीकडे बघा, तो प्रसिध्द पुतळादिसेल वगैरे गोष्टींमध्ये मला फारसा रस नसतो. म्हणजे भव्यदिव्य म्हणून मी नायगारा धबधबाही दोनतीनदा बघितलाय, पण त्यापेक्षा मानवीस्वभावातल्या कंगोर्यांचा, त्यातल्या संस्कृतीच्या इतिहासाचा आणि त्यातल्या माणुसकीचा धबधबा आपण जेव्हा बघतो आणि त्यात जेव्हाआपण नहातो तेव्हाच तो देश आपण खर्या अर्थानं बघतो असं मला वाटतं. ‘ट्वेंटी लॅटिन अमेरिकाज’ अशा कुठल्याशा शीर्षकाचं दोन भागातलं एक सुंदर पुस्तक आहे. खरंतर ते प्रवासवर्णन आहे. दक्षिण किंवा लॅटिनअमेरिकेतल्या वीस देशांविषयी त्यात सखोल प्रवासवर्णनं आहेत. पण त्यात ‘सकाळी सात वाजता उठलो, आठला त्याच गावातल्या काकूंनीकेलेले पोहे खाल्ले आणि १० वाजता तो टॉवर बघितला’ अशी फुसकी, तीच ती प्रवासवर्णनं नसून त्या त्या देशातल्या लोकांशी भिडून, त्याच्याइतिहासात डोकावून, त्या संस्कृतीकडे माणुसकीनं बघून त्यातल्या वेगवेगळ्या थरातल्या लोकांविषयी त्यात लिहिलं होतं. ते मनाला खूपचभिडणारं होतं. मराठीत तसं भिडणारं पुस्तकं म्हणजे मुंबईविषयी लिहिलेलं ‘अर्धी मुंबई’ हे युनिक फिचर्सचं एक ग्रेट पुस्तक. मला अशातर्हेनं देश बघायला आवडतो. प्रत्येक देश मी असाच बघायचा प्रयत्न केला. अमेरिकेतही ब्लॅक्स, प्युटोर रिकन्स, मेक्सिकन्स या लोकांमध्येजाऊन, मिसळून त्यांची संस्कृती, मनोवृत्ती आणि इतिहास समजून घेण्यात धमाल आली. म्हणजे ते सगळं पूर्णपणे कळलं असं म्हणता येणारनाही, पण थोडंतरी ते समजलं. तर सांगत होतो की एकदा मी सिनसिनाटीहून टॅक्सीतून एअरपोर्टकडे निघालो होतो. त्या ब्लॅक टॅक्सीचालकाशी बोलायला लागलो. एअरपोर्टवरचाड्राईव्ह एक तासाचा होता. मग खूप गप्पा झाल्या. मुलं किती, काय करतात, का शिकत नाहीत वगैरे. त्याच्या एका मुलाला मायकेलजॅक्सनसारखं संगीतकार व्हायचं होतं. मग संगीतावर गप्पा चालू झाल्या. माझ्याकडे एक मराठी गाण्यांची कॅसेट होती. (त्याकाळी सीडीजनुकत्याच आल्या होत्या) मी त्याला ती ऐकण्याविषयी विचारलं. तो तयार झाला. मग मी ती गाणी लावली! ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘घट डोईवर,घट कमरेवर’ अशा तर्हेची ती गाणी होती. मी एका संशोधकाच्या नजरेनं प्रत्येक गाण्याच्या वेळी त्याच्या चेहर्यावरचे भाव टिपत होतो. त्यालात्याचा अर्थ कळत नव्हता पण गाण्याचे सूर कुठेतरी त्याच्यापर्यंत पोहोचत असावेत. तो त्याच्याही नकळत गाण्याला दाद देत होता. अमेरिकनपध्दतीप्रमाणे प्रत्येक गाण्याला उगीचच तो ‘ग्रेट’ म्हणत होता. जात, धर्म, देश, वर्ण या सगळ्यांना भेदून माणसाला संगीत एकत्र कसं आणूशकतं याचं ते प्रत्यंतर होतं! त्यावेळी एअरपोर्टवर आल्यावर भाडं देऊन मी निघालो. आणि त्या गडबडीत तो ती कॅसेट गाडीतल्या टेपरेकॉर्डरमधून काढून मला द्यायलाविसरला. मी एअरपोर्टमध्ये शिरलो आणि माझ्या लक्षात आलं. आता मधले अनेक तास आपल्याला वॉकमनवर काहीच ऐकता येणार नाही याकल्पनेनं मी उदास झालो. मी टॅक्सी तर जाताना बघत होतो. आता काय करणार? मी सामान घेऊन एअरपोर्टच्या बाहेर येऊन चाळीस मिनिटंउभा राहिलो. आणि आश्चर्य म्हणजे थोड्या वेळानं तो टॅक्सीवाला चालक परत येत होता. तो माझ्यासमोर येऊन धडकला आणि ‘माय फ्रेंडयुवर कॅसेट’ म्हणून कॅसेट माझ्या हातात ठेवून चालता झाला. मी त्याच्या प्रामाणिकपणाकडे थक्क होऊन बघतच राहिलो! आणि मुख्य म्हणजेचाळीस मिनिटं पुन्हा टॅक्सी चालवत दुसर्या भाड्याची पर्वा न करता स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करुन केवळ माझी कॅसेट परत करण्यासाठीतो आला होता. त्यात त्या कॅसेटच्या किंमतीपेक्षा त्यातल्या गाण्यांचं त्यावेळी मला किती महत्व होतं ते तो पूर्णपणे जाणून होता! १९९०च्या आणि २०००च्या दशकात बरेच बदल घडले. रुडॉल्फ ज्युलियानी न्यूयॉर्कचा मेयर बनला. त्यानं खूप कडक नियम केले आणिकाळ्यांचे ड्रग्जचे आणि गुंडगिरीचे न्यूयॉर्कमधले अड्डे नष्ट केले. इतरही काही शहरात असंच घडलं. पूर्वी डीट्रॉईटला सिटीसेंटरमध्ये खूपभीतीदायक वातावरण असे. ते आता कमी झालं. ब्रिजपोर्ट हे शहर तर एकेकाळचं प्रचंड भयानक आणि काळ्या दादागिरीचं. जनरल इलेक्ट्रिकबरोबरच्या कामानिमित्त मला तिथे जावं लागे. ब्रिजपोर्टमध्येही थोडेफार बदल घडत होते. गोर्यांच्या दृष्टीनं जरी आता सुरक्षितता वाढलीअसली तरी काळ्यांवर प्रचंड दडपशाही चाललेली होती. याचं कारण त्यांच्यातली बेकारी आणि दारिद्य्र ही मूळं कारणं काही नष्ट होत नव्हती.उलट मुक्त बाजारपेठेच्या निओलिबरल समाजव्यवस्थेमध्ये ही गरीब-श्रीमंत दरी प्रचंड वाढली. कट्रिनाच्या वादळाच्या-संकटाच्या वेळी त्यांचीखरी-स्थिती काय होती आणि बुश सरकारनं त्यांना कशी मदत केली नाही हेही सगळ्या जगानं बघितलं. या सगळ
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|