होय व्यसनमुक्ती शक्य आहे! आपल्या समाजातील खूप मोठा वर्ग व्यसनांच्या विळख्यात अडकलाय. गुटका-तंबाखू, विडी-सिगारेट, दारू, गांजा-अफीम-हेरॉईन-गर्द अशा एक ना अनेक व्यसनांनी लाखो लोकांची आयुष्य विस्कटून टाकली आहेत. त्यांची कुटुंब होरपळत आहेत. व्यसनाधीन व्यकती, त्याची बायको-मुलं, आई-वडील, मित्र- नातेवाईक या साऱ्यांच्याच आयुष्याची त्यामुळे नासाडी होत आहे.
व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचं तरी कसं, हाच प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. व्यसनांविषयी, त्यावरील उपचाराविषयी व्यसनमुक्तीसाठी मदत करणाऱ्यांविषयी माहिती देणारं हे पुस्तक. स्वत: व्यसनाधीनतेचा अनुभव घेतलेल्या नी व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या लेखकाने लिहिलेलं.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|