राजा कसा असावा- सामर्थ्यवान, क्षमाशील, दयाळू, सात्त्विक, औदार्यपूर्ण हे सर्वसामान्य सूत्र. पण महाभारतातील धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कणिक या मंत्र्याला ते मान्य नव्हते. राज्याने राज्य राखण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. त्यात नीती-अनीती, दुष्ट-सुष्ट याचा विचार करू नये. शत्रूचा नाश करायचाच, पण तो आपण केला आहे, हे कळू द्यायचे नाही, इतके मित्रत्वाचे संबंध ठेवायचे, अशी त्याची नीती होती. पांडवांना कायम पाण्यात पाहणार्या धृतराष्ट्राला कणिक कायम सल्ले देत असत.
हे सल्ले म्हणजेच कणिकनीती. स्वतःच्या राष्ट्राचे रक्षण कसे करायचे हे त्याने दूरदृष्टीने शास्त्री सिद्घान्तांनुसार सांगितले. परकीयांचे आक्रमण होते ही कुनीती राजनीतीचे अंग बनू शकते, हे कणिकाने दाखवून दिले आहे. महाभारताच्या आदिपर्व काळातील या कणिकनीतीची महती दाजी पणशीकर यांनी ‘कपटनीती’तून सांगितली आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|