Title | Price | |
Karyarat | Rs.180 | In Stock |
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.
आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|