"लावणी' म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर केवळ शृंगारिक लावणीच येते. खरंतर लावणीचा तो एक प्रकार आहे. सोपान खुडे यांनी या लोककलेचा शोध घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. 17 प्रकरणांमधून त्यांनी लावणी प्रकाराचा वेध घेतला आहे.
तमाशा आणि लावणी याची पेशवेकाळाच्या आधी सुरवात झाली, तिथपासून ते आता चित्रपटांत दिसणाऱ्या लावणीचा त्यांनी शोध घेतला आहे. अनेक शाहिरांची माहिती त्यांनी यामध्ये दिली आहे. लावणी या कलाप्रकाराची ज्याला माहिती करून घ्यायची असेल, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे असे आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|