मोजके, पण अक्षरधन लिहिणे ही डॉ. श्रीकांत मुंदरगी यांची ख्याती आहे. अथक परिश्रमातून त्यांनी अभिनेत्री मधुबालाच्या जीवनाचा संपूर्ण पट उलगडणारा ग्रंथ सिध्द केला आहे. मधुबाला हे रुपेरी पडद्याला पडलेले स्वप्न. हे सुंदर स्वप्न झपाटणारे होते, अनुपम होते. तेच झपाटलेपण डॉ. श्रीकांत मुंदरगी यांचे पुस्तक देते. मधुबालाबद्दल बरेच लिहिले गेले, तिचे जीवन हिच मुळी एक आख्यायिका. मात्र तिच्या जीवनाचा एकत्रित तपशिल कुठेही नव्हता. चित्रपट अभ्यासकांच्या दृष्टीने ही फार मोठी उणिव राहिली होती. डॉ. मुंदरगी आणि प्रतीक प्रकाशन यांनी मधुबालावर, तिच्या सौंदर्याचा मान राहील एवढा देखणा ग्रंथ तयार करून ती उणिव दूर केली. मधुबालाचे चित्रपट, तिचे नायक, तिचे खासगी आयुष्य, तिची सुंदर छायाचित्रे हे सर्व काही या पुस्तकात आहे. हा महाग्रंथ वाचनीय बनला आहे. तवेढाच तो संग्रही ठेवावा असा आहे. विशेषत: मधुबालाच्या चाहत्यांसाठी ही मोठीच ठेव म्हणायला हवी.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|