ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे पुत्र श्रीधर माडगूळकर यांनी आपल्या वडिलांच्या सहवासातील आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.
समस्त मराठी माणसांच्या मनात आदराचं स्थान मिळवणाऱ्या "गदिमां'ची अनेक रूपे होती. पिता, भाऊ, पती, मित्र, वक्ता, अभिनेता आणि राजकारणी अशा विविध रूपातील किस्से या पुस्तकात वाचायला मिळतात.
"गदिमां'नी ऐनवेळी लिहिलेली गाणी, अनेकांना केलेली मदत अशा विविध गोष्टी या आठवणींमधून कळत जातात. खरोखर तो मंतरलेला कालखंड होता याची जाणीव या आठवणी वाचून होते.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|