सुबोध जावडेकरांच्या या कथा माणसांच्या वेगवेगळ्या प्रश्र्नांना भिडणार्या कथा आहेत. त्या विज्ञानकथा आहेत असं म्हणण्यापेक्षा विज्ञान आणि माणूस याचं आज जे एकसंध रसायन झालं आहे, त्या संबंधीच्या कथा आहेत.
माणूस आणि विज्ञान यांचा संबंध काय हे या कथांतून दिसून येतं. माणूस विज्ञानाला कसा प्रतिसाद देतो आणि प्रतिकार करतो. असं दोन्ही आहे. त्या रंजक आहेत पण रंजन नाही करत, उलट अंगावर येतात. एक प्रकारचं शोकात्म भान देतात.
त्या जे नैतिक प्रश्र्न निर्माण करतात ते प्रश्र्न आजचे, ह्या घटकेचे नसतात, आणि त्यावेळी ते विज्ञानाच्याही पलीकडे जातात.
वास्तव जीवन काय आहे, जगताना माणसाला कोणकोणत्या पेचांना तोंड द्यावं लागतं, कोणत्या प्रश्र्नांना सामोरं जावं लागतं-आणि भविष्यात जावं लागेल. हे या कथांतून येतं. या दृष्टीनं पाहिलं तर रखरखीत वास्तव, जीवनाबद्दलचं भाष्य आणि भाष्यातून निर्माण होणारं जीवनाचं रहस्य, या तीनही अंगानं या कथा मला महत्त्वाच्या वाटतात. अभिजात वाटतात.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|