१९९२... ‘रोजा’मधील ‘दिल है छोटासा’ या आशादायी गीताद्वारे त्याने साद घातली... अखिल भारतातील संगीत रसिकांना त्यातील बहुस्तरीय संगीतातून चित्रपटसंगीतातील परिवर्तनाची गाज ऐकू आली. २००९... ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ मधील ‘जय हो’ गीताद्वारे त्याने आनंददायी पुकारा केला... जगाच्या कानाकोपर्यातील रसिकांना त्यातून चैतन्यदायी सामुहिक ऊर्जेची अनुभूती लाभली... रहमानचे हात ‘ऑस्करच्या आसमंताशी’ पोहोचलेले होते. ए.आर.रहमानची संगीत कारकीर्द अनेक अर्थाने वादळी ठरते; त्याचप्रमाणे जन्मापासून त्याचा जीवनप्रवासही थक्क करणारा ठरतो. रहमानचा संगीतप्रवास ० संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरुद्ध बंड करणारी कार्यपद्धती ० आधुनिक तंत्रज्ञानावरील व ध्वनिपरिणामावरील हुकूमत ० सूफी ते पाश्चात्त्य संगीत— अनेक प्रभाव ० विविध दिग्दर्शक, वादक, गायक, गीतकारांसोबतचा सुसंवाद ० अनेक गीतांच्या निर्मितीमागची प्रक्रिया, जीवनप्रवास ० अतीव दु:ख, अवहेलना, न्यूनगंड यांनी कोळपून गेलेलं बालपण ० धर्मांतर, धर्मनिष्ठा आणि संगीतनिष्ठा यातून लाभलेलं मनोबल ० संगीताप्रमाणेच त्याच्या जीवनालाही उभारी देणारं त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान अशा अनेक पैलूंच्या अंगाने रहमानच्या समग्र ‘जीवन-संगीता’चा वेध घेणारं पुस्तक... ‘ए.आर.रहमान - संगीतातील वादळ’

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|