राम नगरकर हे नाव आपल्यापुढं प्रथम आलं, ते एक नट म्हणून – तेही एक विनोदी नट म्हणून.
‘विच्छा माझी पुरी करा’ मधील ‘मावशी’ आणि ‘हल्या’ या दोन भूमिकांमुळे ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले.
त्यानंतरच्या ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘मी लाडाची मैना तुमची’, इत्यादी लोकनाट्यांतील त्यांच्या अन्य भूमिकाही तेवढ्याच गाजल्या. चित्रपटांमधूनही त्यांनी काही भूमिका केल्या. हे झालं त्यांचं बहुरुपी रुप.
आज ते आपल्यापुढं येताहेत एका एकपात्री प्रयोगात. सोबत आहेत त्यांच्या नागर आणि जानपद जीवनातले अनगड अनुभव. समृद्ध आणि विनोदानं रसरसलेले जिवंत अनुभव.
असे अनुभव आपल्या गावरान भाषेत शब्दबद्ध करताना स्वत:च्याच अंधश्रद्धा, मूर्ख समजुती, बेगंडी प्रतिष्ठा, खोटा लौकिक, दंभ, अहंकार यांची प्रच्छन्न, परंतु रांगडी टवाळी उडवून वाचकांना हास्यरसात डुंबत ठेवण्याचे त्यांचे कौशल्य विरळेच मानावे लागेल.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|