सैन्यदलातील काम देशसेवेशी निगडीत असते. अमर पळधेही सैन्यदलात जाऊन देशसेवा
करण्याची स्वप्न पाहत होता. लहानपणापासून खेळांची आवड असणारा अमर सेलर म्हणून नौदलात रुजू झाला. आणि काही दिवसांतच डाईव्ह मारताना त्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची बातमी कुटुंबियांना देण्यात आली.
उत्तम पोहणाऱ्या अमरचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यातील सत्य शोधण्याचा त्यांचा लढा तेथून पुढे सुरु झाला. आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक पुरावे सादर केले; पण नौदलाने अद्याप चूक कबुल केलेली नाही. वयाच्या ६५ व्या वर्षीही अनुराधा पळधे यांचा बलाढ्य संस्थेविरुद्ध लढा सुरु आहे. केवळ आपला मुलगा कसा गेला, हे समजावे व मुलाला न्याय मिळावा यासाठी
गेल्या १८ वर्षांपासून सुरु असलेली वीरमातेची ही धडपड त्यांनी स्वतः 'संघर्ष एका आईचा-नौदलाशी' यातून मांडली आहे. यातील सत्य, वास्तव कथन वाचून वाचकही हेलावून जातात..
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|