चिम्पाझीच्या सहवासात डॉ. जेन गुडाल
“जगातल्या हिस्त्र श्वापदांनी भरलेल्या या आफ्रिकेच्या घनदाट जंगलात मी पोहोचलेय! अगदी एकटी! शहरी वातावरण असलेल इंग्लंड हजारो मैल दूर राहिलंय. खरच आज मी सर्वार्थान लहानपणापासून उराशी जपलेलं स्वप्नच साक्षात जगतेय, ह्या जीवनाशी मी हळूहळू जमवून घेतेय....” – डॉ. जेन गुडाल
लंडन मध्ये जन्म घेतलेली पण लहानपणा पासून प्राण्यांच्यावर प्रेम करणारया एका ध्येय वेड्या मुलीची गोष्ट म्हणजे “चिम्पाझीच्या सहवासात डॉ. जेन गुडाल” पुस्तक. २६व्या वर्षी जेन आफ्रिकेतील गोम्बे पार्क येथे चिम्पाझीच्यावर संशोधन करण्याची संधी मिळाली व त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. चिम्पाझी हा मानवापासून दूर दूर राहतो व गोम्बे सारख्या जंगलामध्ये जेथे मांससाठी त्यांची गुप्त पद्धतीने हत्या होत असताना तर जवळ पास हे अशक्यच.
पहिले काही महिने जेनला तर चिम्पाझीचे साधे दर्शन देखील झाले नाही पण तिने चिकाटी न सोडता नियमितपणे आपले संशोधन चालू ठेवले. रोज निरक्षण व त्याच्या नोंदी करत राहणे व त्याच सोबत चिम्पाझीच्या समूहाशी ओळख वाढवणे या कामासाठी तिला अडीच वर्ष लागली. त्यां नंतर तिने पन्नास वर्ष चिम्पाझीच्या वर संशोधन करण्यात व्यतीत केली. चिम्पाझी तिच्यासाठी केवळ संशोधनाचा विषय राहिले नाहीत तर त्यांच्याशी तिचे जीवाभावाचं नाते जुळले, त्यांची सुख-दुखे, त्यांची भाषा, समजून घेण्यार्या जेन चे नाव जगभर आदराने घेतले जाते. त्याकाळातील तिने केलेले संशोधन व तिची चिम्पाझी सोबत झालेली मैत्री, समुहातील नर मादी चिम्पाझीनां तिने दिलेली नावे व त्यांच्या नोंदी हे सर्व वाचण्यासारखे आहे, हो जेन चा हा प्रवास मराठी मध्ये शैलेजा देशमुख यांनी अत्यंत सुंदर अश्या भाषेत व चित्रवत शैली मध्ये पुस्तक लिहिले आहे जे नंदनी प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे, १३४ पानाचे पुस्तक आहे व याची किमंत १४० रु. आहे.
चिम्पाझीच्या सहवासात डॉ. जेन गुडाल “जगातल्या हिस्त्र श्वापदांनी भरलेल्या या आफ्रिकेच्या घनदाट जंगलात मी पोहोचलेय! अगदी एकटी! शहरी वातावरण असलेल इंग्लंड हजारो मैल दूर राहिलंय. खरच आज मी सर्वार्थान लहानपणापासून उराशी जपलेलं स्वप्नच साक्षात जगतेय, ह्या जीवनाशी मी हळूहळू जमवून घेतेय....” – डॉ. जेन गुडाल लंडन मध्ये जन्म घेतलेली पण लहानपणा पासून प्राण्यांच्यावर प्रेम करणारया एका ध्येय वेड्या मुलीची गोष्ट म्हणजे “चिम्पाझीच्या सहवासात डॉ. जेन गुडाल” पुस्तक. २६व्या वर्षी जेन आफ्रिकेतील गोम्बे पार्क येथे चिम्पाझीच्यावर संशोधन करण्याची संधी मिळाली व त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. चिम्पाझी हा मानवापासून दूर दूर राहतो व गोम्बे सारख्या जंगलामध्ये जेथे मांससाठी त्यांची गुप्त पद्धतीने हत्या होत असताना तर जवळ पास हे अशक्यच. पहिले काही महिने जेनला तर चिम्पाझीचे साधे दर्शन देखील झाले नाही पण तिने चिकाटी न सोडता नियमितपणे आपले संशोधन चालू ठेवले. रोज निरक्षण व त्याच्या नोंदी करत राहणे व त्याच सोबत चिम्पाझीच्या समूहाशी ओळख वाढवणे या कामासाठी तिला अडीच वर्ष लागली. त्यां नंतर तिने पन्नास वर्ष चिम्पाझीच्या वर संशोधन करण्यात व्यतीत केली. चिम्पाझी तिच्यासाठी केवळ संशोधनाचा विषय राहिले नाहीत तर त्यांच्याशी तिचे जीवाभावाचं नाते जुळले, त्यांची सुख-दुखे, त्यांची भाषा, समजून घेण्यार्या जेन चे नाव जगभर आदराने घेतले जाते. त्याकाळातील तिने केलेले संशोधन व तिची चिम्पाझी सोबत झालेली मैत्री, समुहातील नर मादी चिम्पाझीनां तिने दिलेली नावे व त्यांच्या नोंदी हे सर्व वाचण्यासारखे आहे, हो जेन चा हा प्रवास मराठी मध्ये शैलेजा देशमुख यांनी अत्यंत सुंदर अश्या भाषेत व चित्रवत शैली मध्ये पुस्तक लिहिले आहे जे नंदनी प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे, १३४ पानाचे पुस्तक आहे व याची किमंत १४० रु. आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|