या पुस्तकात सात ते आठ वर्षांतील हजारो विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या अनुभवांवर आधारित तत्त्वे सांगितलेली आहेत. आमच्या अॅकेडमीत ज्यांनी ज्यांनी कार्यशाळेत भाग घेतला, त्या सर्वांनाच चांगला फायदा झाला. या पुस्तकात अशा काही युक्त्या सांगितलेल्या आहेत ज्या स्वतः मी व माझ्या विद्यार्थ्यांनी उपयोगात आणल्या आहेत. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात करता येण्यासारख्या आहेत.
या पुस्तकाचे दोन भाग आहेतः
- व्यक्तिमत्त्वविकास
- अभ्यासकौशल्य
व्यक्तिमत्त्व कसे विकसित होते, संभाषणकौशल्य कसे चांगले करता येईल? माणसे कशी जोडावीत? क्रोधावर कसे नियंत्रण ठवू शकाल?
हल्लीच्या स्पर्धात्मक व तणावयुक्त युगात तणावमुक्त आयुष्य कसे जगावे? तणाव नियोजनासाठी अनेक खात्रीदायक उपाय. मनाची शक्ती कशी वाढवावी? कल्पकता म्हणजे काय? चिकाटी हा गुण कसा वाढवता येईल? सकारात्मक सूचनेचे फायदे काय?
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य कसे सांभाळाल? उंची कशी वाढवाल? संदिग्ध अवस्था का? निर्णयक्षमता कशी वाढवाल? जीवनात ध्येय का हवे? आतापर्यंत तुमचे वेळेचे नियोजन अपेक्षेप्रमाणे यशस्वी का झाले नाही? अभ्यास का करायचा? अभ्यासाचा कंटाळा का येतो? तो कसा घालवायचा? आपण केलेला अभ्यास व इतर गोष्टी का विसरतो? प्रश्र्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायला हव्यात? परीक्षेच्या दिवसांत कशी काळजी घ्यायला हवी?
या पुस्तकात असे अनेक मुद्दे आहेत की ज्यामुळे तुमचे आयुष्यच पूर्णपणे बदलू शकते.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|