सरांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली, हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि असं करता करता एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले. तर असे हे सर! मि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. सुरुवातीच्या काळात त्यांना वर्गातील मवाली मुलांशी सामना करावा लागला. पण एक दिवस हीच गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुलं त्यांना 'सर' म्हणून आदरानं हाक मारू लागली. किती नकळत हे सरांनी त्या मुलांच्या गळी उतरवलं! एवढंच नव्हे... त्या मुलांच्या बरोबरीनं त्यांच्याच गलिच्छ वस्तीत वाढलेल्या पोरींना सन्मानानं 'मिस्' म्हणून हाक मारायलाही त्या मुलांना सरांनीच शिकवलं. त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं. एक दिवस या सर्वच्या सर्व सेहेचाळीस मुलांना सर म्युझियम आणि ऑपेरा दाखवायला घेऊन गेले! तेव्हा मात्र सर्वांनाच वाटलं आता दंगा होणार. पण घडलं काही वेगळंच. जणू नवलच! एका ध्येयानं प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाचं, द्वेषाचं, तिरस्काराचं रूपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मसन्मानात केलं. आत्मविश्वासात केलं. दुसऱ्यांवर नाहक संतापण्याऐवजी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा असतो, हे त्या मुलांना शिकवलं. एका शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्याविषयीची तळमळ, त्यांच्याविषयी वाटणारी सहसंवेदना, कळकळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम या सर्वांचाच हा विजय होता.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|