मीरा हा शब्द उच्चारताच भक्तीचं स्मरण होतं... मीरा हे एक वास्तव आहे. भक्तीच्या शक्तीस आकारच द्यायचा झाला तर मीरेची भावमुद्रा, तंबोरा सहजतया आपल्या नजरेसमोर येतो. पण मीरा या बाह्य छबीच्या फार पुढे निघून गेली आहे. म्हणजे नेमकी कुठं पोहोचली हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी हे पुस्तक त्या महामार्गाचा नकाशा आहे. आपणास ते ठिकाण गाठायचं असेल तर हे पुस्तक गायला हवं... वाचायला हवं... मीरेच्या भक्तीला आपल्या हृदयात सजवायला हवं... त्यासाठी स्वतःलाच मीरा व्हावं लागेल. मीराप्रतिमेच्या पुढं ‘मीरामंझील’पर्यंत पोहोचावं लागेल. हे पुस्तक वाचल्यानं भक्तीचा अनमोल नजराणा आपणास गवसेल.
मीरा हे ईश्वराच्या सर्वाधिक प्रिय अशा गुणाचं नाव आहे. मीरा हे अशा अवस्थेचं नाव आहे जिथं माणूस स्वतःला जाणून ईश्वराची अभिव्यक्ती करू लागतो. मग ती अभिव्यक्ती गाऊन, गुणगुणून अथवा लोककल्याणाची काम करून, पद, दोहे, कवने, कवितांच्या माध्यमातूनही होऊ शकते. मीरेच्या शरीराद्वारे जी अभिव्यक्ती झाली ती पदांद्वारे, भजनांद्वारे व प्रेमरसाने ओथंबलेल्या स्वरांनी गाऊन झाली.
या पुस्तकास आशेचा एक किरण बनवा. भक्तिसाधनेनं, आराधनेनं आपलं मन साध्य करा. हे पुस्तक म्हणजे सांसारिक मोहातून विमुक्त होण्याचा एक कौतुकास्पद प्रयोग आहे. या पुस्तकात मीरेच्या भजनाचे काही अंश उद्धृत केले आहेत. यामागचा एकमात्र उद्देश... मीरेसारखी कृष्णभक्ती... अभिव्यक्ती आपल्यातही उतरावी.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|