भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे ‘स्वराज्य’ पुस्तक आता मराठीतही उपलब्ध होत आहे. सत्यव्रत प्रकाशन संस्थेने हे पुस्तक मराठीत आणले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाचे भाषांतर श्रीनिवास जोशी यांनी केले आहे. विख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ केले आहे. स्वत: केजरीवाल, जोशी आणि अवचट यांनी कोणतेही मानधन न घेता या पुस्तकाचे काम केले आहे.
देशातील भ्रष्टाचाराची निर्मिती, त्याची मूळ कारणे, राजकारण्यांची भीती सामान्यांना का वाटते, ही भीती कशी घालवता येईल, भ्रष्टाचार कसा नष्ट करता येईल, इतकी वर्षे लोकशाही व्यवस्था असूनही ख-या अर्थाने लोकशाही कशी रुजेल, या प्रश्नांचा तर्कसंगत ऊहापोह केजरीवाल यांनी प्रस्तुत केला आहे. ते स्वत: आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा अनुभव घेतला आहे. आयकर विभागात उच्च पदावर काम केल्याने सरकारी कार्यप्रणालीचा मोठा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्यानंतर माहिती अधिकाराची चळवळ त्यांनी यशस्वीरीत्या चालवली. या कार्यासाठी ते मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी अवघ्या 36 व्या वर्षी ठरले. त्यानंतर परिवर्तन संस्थेमार्फत त्यांनी दिल्लीतील सुंदरनगरी भागात थेट लोकशाहीचा प्रयोग राबवला. लोकांच्या हातात विकासाची प्रक्रिया सोपवून लोकच स्वत:चा विकास कसा घडवून आणू शकतात हे त्यांनी दाखवून दिले होते. जगभरातील सर्व लोकशाहीचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. त्यातून झालेले मंथन त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.
१५ ऑगस्ट नंतर पुस्तक घरपोच मिळेल.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे ‘स्वराज्य’ पुस्तक आता मराठीतही उपलब्ध होत आहे. सत्यव्रत प्रकाशन संस्थेने हे पुस्तक मराठीत आणले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाचे भाषांतर श्रीनिवास जोशी यांनी केले आहे. विख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ केले आहे. स्वत: केजरीवाल, जोशी आणि अवचट यांनी कोणतेही मानधन न घेता या पुस्तकाचे काम केले आहे. देशातील भ्रष्टाचाराची निर्मिती, त्याची मूळ कारणे, राजकारण्यांची भीती सामान्यांना का वाटते, ही भीती कशी घालवता येईल, भ्रष्टाचार कसा नष्ट करता येईल, इतकी वर्षे लोकशाही व्यवस्था असूनही ख-या अर्थाने लोकशाही कशी रुजेल, या प्रश्नांचा तर्कसंगत ऊहापोह केजरीवाल यांनी प्रस्तुत केला आहे. ते स्वत: आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा अनुभव घेतला आहे. आयकर विभागात उच्च पदावर काम केल्याने सरकारी कार्यप्रणालीचा मोठा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्यानंतर माहिती अधिकाराची चळवळ त्यांनी यशस्वीरीत्या चालवली. या कार्यासाठी ते मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी अवघ्या 36 व्या वर्षी ठरले. त्यानंतर परिवर्तन संस्थेमार्फत त्यांनी दिल्लीतील सुंदरनगरी भागात थेट लोकशाहीचा प्रयोग राबवला. लोकांच्या हातात विकासाची प्रक्रिया सोपवून लोकच स्वत:चा विकास कसा घडवून आणू शकतात हे त्यांनी दाखवून दिले होते. जगभरातील सर्व लोकशाहीचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. त्यातून झालेले मंथन त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. १५ ऑगस्ट नंतर पुस्तक घरपोच मिळेल.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|