तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग अंधश्रद्धा निर्मुलनाशी
संबंधित थेट बाबींच्याबद्दल आहे. दुसरा विभाग सर्व बाबींच्या संदर्भात अंनिसने जी
कृतीशील झुंज दिली त्याबद्दल आहे. यामुळे वैचारिक मांडणीला प्रत्यक्ष कार्याचा
भरभक्कम पाया मिळतो. त्यानंतरचा तिसरा विभाग हा सैद्धांतिक आहे. अंधश्रद्धा
निर्मूलनाच्या विषयाशी संबंधित जे विषय सतत चर्चिले जातात, त्यांची मांडणी केली आहे.
याप्रमाणे पहिल्या विभागात वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, मनाचे आजार.
भुताचे झपाटणे, भानामती या विषयांची सर्वांगीण मांडणी केली आहे. तर दुसऱ्या विभागात बुवाबाजीच्या
संदर्भातील 'साहिबजदीजी करणी', 'कमरअली दरवेशचा चमत्कार', 'लंगरचा चमत्कार', 'गोडबाबा',
'कुशीऱ्याचा दैवी उपचार' यांची माहिती आहे. अशा माहिती सोबतच काही रंजक व उद्बोधक घटना
वाचकांना मिळतील.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|