तुकारामबाबांचे जीवन, म्हणजे मन आणि जनलोक या उभयतांसवें रात्रंदिवस चालणारा समरप्रसंग. त्यांची अभंगगाथा हा या समराचा त्यांनीं काढलेला आलेखच आहे.
त्या अभंगांचे सूत्र कुठेंही सुटू न देतां, त्यांतील अन्त:प्रवाहांची नोंद घेत चितारलेलें बावांचे जीवनचित्र म्हणजे ‘तुका आकाशाएवढा’.
त्यांचे नि:स्पृहपण, त्यांचा नि:संग स्वभाव, श्रीहरिदर्शनांचे त्यांचे आर्त, त्यांची उत्कटता, विठ्ठलप्रेमाच्या प्रवाहामध्ये त्यांचे स्वत:स झोकून देणें, त्यांची सामाजिक जाणीव हें सारेंच इथें चितारलें गेलें आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|