वय जसे वाढणार, तशी शरीराची झीजही होणार. या वास्तवाची योग्य दखल न घेतल्यास ही झीज शरीर अनेक प्रकारे 'बोलू' लागते... ...मेंदू, विविध अवयव व शरीराचे कार्य मंदावते. मनाला व शरीराला शिथिलता येत जाते. कार्यतत्परता, जोम, उत्साह कमी होत जातो. विविध व्याधी जडतात. मात्र आपण आपल्यासाठी जर थोडा वेळ काढला तर ही हानी थांबवून शरीराला नवा जोम देऊ शकाल. हे पुस्तक या वास्तवाचे भान देऊन नवा जोम, उत्साह व शक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञान व माहिती देते. परिणामी तुम्हाला तुमचे वय थोपवून तर धरता येतेच, पण काही अंशी मागेही नेता येते. मानवी शरीरामध्येच स्वत:ला सतत तरुण ठेवण्याची आणि रोग बरे करण्याची नैसर्गिक क्षमता असते. फक्त त्याला पोषक वातावरण हवे. हे पोषक वातावरण कसे तयार करायचे ते या पुस्तकात दिले आहे. प्राचीन योगशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा संगम या पुस्तकामध्ये आहे. पुस्तकातील सूचना व मार्गदर्शन यामुळे तुम्ही तरुण दिसाल तसेच तुमची जैविक शक्तीही आश्चर्यकारकपणे वाढेल. ठळक वैशिष्टये ? नवतारुण्य देणारे अत्यंत प्रभावी व्यायाम ? तीन अत्यंत परिणामकारक प्राणायाम ? नवतारुण्यदायक पोषक आहार ? कामशक्ती वाढवण्याचे प्रभावी उपाय ? बौध्दिक शक्ती वाढवण्याचे उपाय ? संपूर्ण तंदुरुस्तीचे उपाय ? चेहर्याची काळजी घेण्याचे उपाय ? दैनंदिन उपयोगातील इतर मौल्यवान माहिती
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|