दोनाचे चार हात' झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ 'लग्न' या शब्दाभोवती ! 'चतुर्भुज' कथेतला चिंतातूर वर, 'चुडा' मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, 'अंतर' मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि 'बलिदान' मधील नियतीच्या फे-यात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास 'वपु' शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली..

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|