व. पु.काळे ह्यांचा कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसणे किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्कीलपणे शब्द केलेले असते. त्यातून मत्सरी मंडळींचे 'दिलासा मंडळ’ सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात न त्यातून असे अचूक लिहू शकणार्याबद्दलही मत्सर वाटू लागतो!
संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात- अश्याच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. ज्यता 'मोदी अँड मोदी’ सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही ह्यात आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|