"मला तुमच्या आठवणी सांगाल काय?"
".... कशाकरिता?"
"कशाकरिता? मला तुमच चरित्र लिहायचं आहे!"
"चरित्र -आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्टुडीओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही."
"म्हणूनच मला लिहायचं आहे."
"ह्या प्रभाकरला, मी त्याच्या लहानपणी वडिलांचा हात धरून इथे यायचा, तेव्हापासून पाहतो आहे. सत्तर वर्षे उलटली. आता मला हा 'आठवणी सांगा' म्हणतो आहे. ह्या मधल्या काळात त्यानं इथ काम केलं, मुंबईला गेला. हैद्राबाद, कलकत्ता, मद्रास येथील स्टुडीओ ह्यानं पहिले. अमेरिकेतलेही पहिले. त्या मानानं एका लहानश्या शहरातला मी एक छोटा स्टुडीओ! ह्याला माझं चरित्र का लिहायचं आहे?"
"कारण आपलं जवळचं नातं आहे. तुमची भाषा मला समजेल. आणि तुम्ही जे पाहिलंत, अनुभवलंत, सोसलंत आणि निर्माण केलंत ते माझ्यासारखं आणखीनही काहींना ऐकायला आवडेल."
"खरं आहे! उद्या मी असेन - नसेन. हा लिहिणाराही नसेल. पण कागदावर लिहिलेला शब्द हा कॅमेऱ्यानं बंदिस्त केलेल्या प्रतिमेसारखाच! तेव्हा मी आठवणी सांगायला सुरुवात केली...."
"मला तुमच्या आठवणी सांगाल काय?" ".... कशाकरिता?" "कशाकरिता? मला तुमच चरित्र लिहायचं आहे!" "चरित्र -आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्टुडीओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही." "म्हणूनच मला लिहायचं आहे." "ह्या प्रभाकरला, मी त्याच्या लहानपणी वडिलांचा हात धरून इथे यायचा, तेव्हापासून पाहतो आहे. सत्तर वर्षे उलटली. आता मला हा 'आठवणी सांगा' म्हणतो आहे. ह्या मधल्या काळात त्यानं इथ काम केलं, मुंबईला गेला. हैद्राबाद, कलकत्ता, मद्रास येथील स्टुडीओ ह्यानं पहिले. अमेरिकेतलेही पहिले. त्या मानानं एका लहानश्या शहरातला मी एक छोटा स्टुडीओ! ह्याला माझं चरित्र का लिहायचं आहे?" "कारण आपलं जवळचं नातं आहे. तुमची भाषा मला समजेल. आणि तुम्ही जे पाहिलंत, अनुभवलंत, सोसलंत आणि निर्माण केलंत ते माझ्यासारखं आणखीनही काहींना ऐकायला आवडेल." "खरं आहे! उद्या मी असेन - नसेन. हा लिहिणाराही नसेल. पण कागदावर लिहिलेला शब्द हा कॅमेऱ्यानं बंदिस्त केलेल्या प्रतिमेसारखाच! तेव्हा मी आठवणी सांगायला सुरुवात केली...."
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|