"गाथासप्तशती' हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील ग्रंथ. पुण्यातील "पद्मगंधा प्रकाशनानं हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला असून, स. आ. जोगळेकर यांनी त्याचं संपादन केलं आहे. जोगळेकर यांनी तब्बल 450 पानांची प्रस्तावना या ग्रंथाला लिहिली आहे. ही प्रस्तावनाही एखाद्या स्वतंत्र पुस्तकाप्रमाणंच ठरावी! गेली अनेक वर्षं तो उपलब्ध नव्हता. "ग्रंथराज' या नामाभिधानाला साजेसंच त्याचं स्वरूप आहे. त्याची पृष्ठं आहेत तब्बल 688.
सातवाहन राजांच्या काळात हाल नावाच्या राजानं त्या काळच्या ग्रामीण जीवनाचं वर्णन करणाऱ्या सुभाषितांचं संकलन केलं होतं. तोच हा ग्रंथ - "गाथासप्तशती'. या ग्रंथात सातशे सुभाषितं आहेत. यातील काही सुभाषितं स्वत- हालानं लिहिलेली आहेत; तर बाकीची अन्य कवींची आहेत. त्या वेळचं ग्रामजीवन, चालीरीती, परंपरा असं सगळं काही ही सुभाषितं सांगतात.
"सप्तशती'मधील 700 सुभाषितांशिवाय नंतरची 304 सुभाषितंही या ग्रंथात जोगळेकर यांनी समाविष्ट केली आहेत. सुभाषितांचा अर्थ आणि त्यांचं विश्लेषण करणाऱ्या 450 पानांची प्रदीर्घ प्रस्तावनेसह सिद्ध झालेला हा ग्रंथ अभ्यासकांनी अभ्यास म्हणून तर सर्वसामान्यांनी जिज्ञासा म्हणून आवर्जून वाचावा, असा आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|