पद्मश्री सन्मान प्राप्त, प्रा. भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यविश्वातील मोठं विलक्षण असं व्यक्तिमत्त्व आहे. १९६०च्या दशकात त्यांची ' कोसला ' ही कादंबरी आली आणि एकच खळबळ उडाली. साऱ्या प्रस्थापित जाणीवा आणि व्यवस्था यांना छेद देणारी ही कादंबरी होती; पण तेवढ्यापुरतेच या कादंबरीचं महत्त्व नव्हतं. " कोसला " प्रकाशित होऊन आज अर्धशतक उलटले, तरीही तितक्याच उत्साहाने, उत्कटतेने त्या कादंबरीवर लिहिले / बोलले / चर्चिले जाते यातच तिचे आगळेवेगळेपण ठासून दिसते. विशीतील ज्या वाचकांनी त्या कादंबरीची पहिली आवृत्ती वाचली होती ती पिढी आता सत्तरीत आली आहे, पण " कोसला " म्हातारी व्हायला तयार नाही. या कादंबरीवर बराच काळ चर्चा होत राहिली आणि नेमाडे हे नाव गाजत राहिलं.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|