मराठी कथा आज श्रीमंत आहे. विसाव्या शतकात गोष्ट, स्फुटगोष्ट, संपूर्ण गोष्ट, लघुकथा, नवकथा अशा विविध अवस्थातून ती सिद्ध झाली आहे. ‘पाच कथाकार’ मधे दोन महायुद्धांच्या दरम्यान निर्माण झालेल्या कथेचा आलेख दिवाकर कृष्ण, य. गो. जोशी, वि. स. खांडेकर, वामन चोरघडे, अरविंद गोखले यांच्या निवडक कथांच्याद्वारे वाचकांसमोर ठेवण्यात आला. त्यांना तो आवडलाही. त्याच प्रयत्नाचा उत्तरार्ध म्हणजे ‘सहा कथाकार.’ हा कथासंग्रह. दुसरा महायुद्धानंतर निर्माण झालेली ही कथा नवकथा म्हणजे नव्या जाणिवांतून जन्मलेली, भावविवशता, तंत्रबद्धता, सांकेतिकपणा इत्यादी दोषांपासून मुक्त झालेली कथा. नवकवितेप्रमाणेच जीवनाच्या सा-या अंगांना मनमोकळेपणाने भिडणारी. स्फोटक, दाहक पण प्रौढ. ती कौशल्याने संपादून वाचकांच्या समोर उभी केली आहे, डॉ. भालचंद्र फडक्यांसारख्या कथाव्यासंगी अभ्यासकाने.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|