बुधा नावाचा एक सामान्य पण तरीही एक ध्यास घेतलेला वनवासी आपल्या भोवतालच्या सृष्टीशी एकरूप होऊन तिच्यात कसा विलीन झाला- इतकी साधी अन् एकमार्गी अशी ही कहाणी नाही. या कहाणीत एक मोठा ताण आहे. एका बाजूला सृष्टीशी तदाकार होण्याची माणसाची अनिवार ओढ अन् दुसर्या बाजूला त्यामुळे निर्माण होणारा माणसाचा एकाकीपणा ह्यांमध्ये असा हा ताण आहे. आणि या ताणामुळे ह्या कादंबरीला एक विलक्षण वजन प्राप्त झाले आहे.
ज्या एका आध्यात्मिक दृष्टिकोनाची म्हणा वा अनुभूतीची म्हणा, छाया सबंध कादंबरीभर पसरली आहे, ती म्हणजे माणूस आणि निसर्ग यांत कोणतेही आणि कसलेही वैर नाही, ही अद्वैताची भावना दाण्डेकर यांनी ‘माचीवरला बुधा’ या कादंबरीत सांगितली आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|