Title | Price | |
Mogara Phulala | Rs.180 | In Stock |
ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान-मुक्ताईची आणि प्रात:स्मरणीय अशा त्यांच्या माता-पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ-लौकीक अनुभविले, ते तर ‘शब्देंविण’ संवादिण्यासारखे!
अशांची चरित्र-चित्रे रेखाटण्यास कलाकाराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिद्धी ‘अमृतातेंहि पैजा’ जिंकणारी असावी लागते.
‘भावार्थदीपिके’च्या सौम्य-शांत, प्रसन्न-मनोहर, जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो. नी. दाण्डेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप ‘दावण्या’चा ध्यास घेतला.
आजच्या कळाहीन जगात ‘ज्ञानेश्वरी’ जगू पाहणार्या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी त्यांनी या आधीच आपल्या ‘मृण्मयी’ या कादंबरीत सांगितली आहे. पण ‘वसुधैव कुटुंबकम्’ झालेल्या त्या मूळ कुटुंबाची कथा-गाथा गायिल्याविना त्यांचे कविमन कृतार्थ होऊ शकत नव्हते.
आता ‘मोगरा फुलला’ आहे, फुले वेचिता कळियांसी बहर आला आहे; कल्पित पात्रांच्या मुखांतून अकल्पिताची कथा सांगण्याचे नवल वर्तले आहे. ह्या नवलगंधाने दाण्डेकर प्राणा-मनांतून फुलून आले आहेत, आणि मराठी कादंबरी-सृष्टीला एक नवलभेट देऊन कृतकृत्य झाले आहेत.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|