पण मी एकूणातच यशस्वी होण्यावर प्रेम करणारा माणूस आहे. मग ते काही असो. मी जेव्हा रेणूशी मैत्री करतो तेव्हा मला तिचं जबरदस्त प्रेमच मिळवायचं असतं... आणि जेव्हा समोर साने किंवा रमणी असतात तेव्हा आय जस्ट नो, आय मस्ट विन!’’
‘कदाचित तुझं बरोबर असेल. पण मग एक मुद्दा नव्यानं वर येतो. तू जो खेळ खेळतोस त्यात फसवणूक नियमबाह्य गोष्ट नाही! पण जगण्याच्या मूलभूत नियमांशी ही फारकत नाही?’
औद्योगिक विश्वाच्या दणकट वास्तवाचं मायक्रोस्कोपिक अस्सल दर्शन घडवता घडवता जगण्याचे मूलभूत नियम तपासून पाहणारी आणि त्याचबरोबर एका भावूक कवीची यशस्वी मॅनेजरपर्यंतची वाटचाल दाखवणारे आरोह आणि कांक्षेच्या अश्वापायी फरपटण्याचे अवरोह मांडणारी ताज्या दमाच्या लेखकाची ही कादंबरी.
लेखक संजय जोशी स्वत: मोठ्या कंपनीत व्यवस्थापकपदावर असल्याने कंपनीविश्वाचं वास्तव अत्यंत प्रामाणिक अस्सलपणानं घेऊन येणारी कादंबरी. उपनिषदांचे संदर्भ नव्यानं तपासून पाहण्याचं आव्हान करून ‘पॉझिटिव्हली गुड लिव्हिंग’च्या चिरंतन शोधमार्गावरील पहिली कादंबरी : नचिकेताचे उपाख्यान
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|