प्रख्यात इतिहासकार आणि आपल्या परखड अन्वयार्थाबद्दल प्रसिद्ध असलेले लेखक त्र्यं. शं शेजवलकर यांनी १९६१मध्ये म्हणजे या पराभवाला दोनशे वर्ष झाली, तेव्हा लिहिलेला हा ग्रंथ आहे.
'पानिपत १७६१' या ग्रंथातील त्यांचे विश्लेषणही तितक्याच तोलामोलाचे आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शेजवलकरांनी बहुधा प्रथमच मराठेशाहीतील म्हणजेच पेशवाईतील दोषांवर बोट ठेवण्याचे काम केले. त्यापूर्वी पेशवाईतील दोष दाखवणे म्हणजे मराठेशाहीच्या काही कट वगैरे करण्याइतके भयंकर कृत्य समजले जात होते. पण शेजवलकरांनी आपले विश्लेषण हे त्या पलीकडे नेले आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|