पं. रविशंकर यांचे सतारवादन ऐकताना संगीत हृदयापर्यंत पोचल्याचा अनुभव येतो. भारतीय संगीत हृदय उघडे ठेवून ऐकायचे असते, असे ते सांगतात ते त्यामुळेच. संपूर्ण जगात त्यांचे संगीत ऐकले जाते. संगीताबरोबरच त्यांच्या आयुष्याबाबत श्रोत्यांना उत्सुकता असते. म्हणूनच त्यांनी आपली जीवन कहाणी ‘राग- अनुराग’मधून सांगितली आहे. सतारीच्या तारा ते ज्या सहजतेने वाजवतात, त्याच सहजतेने त्यांच्या लेखणीतून शब्द उतरले आहेत. संगीतातील राग व व्यक्ती याबाबतचे लेखन ‘राग’ या विषयाखाली आणि व्यक्तिगत जीवन, मित्र परिवार व कुटुंबीय यांच्याविषयी ‘अनुराग’ या भागात आले आहे. कोणताही आडपडदा, गुपित न ठेवता त्यांनी आयुष्य वाचकांसमोर मांडले आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|