एकोणिसावे शतक हा महाराष्ट्राचा प्रबोधनाचा कालखंड . थोर विचारवंत आणि समाजसुधारकांचा परिसस्पर्श लाभलेला महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा गौरवशाली कालपट . याच काळात स्त्रियांच्या दुःस्थिती - निवारणाचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या काही मोजक्या स्त्रियांकडूनही घडले , त्यांपैकी रमाबाई रानडे हे एक ठळक नाव . खरेतर सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने घेण्यायोग्यतेचे नाव . मात्र त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा जेवढा परिचय देशवासियांस व्हावयास हवा होता तेवढा दुर्दैवाने झालेला दिसत नाही . खुद्द महाराष्ट्रालाही त्यांचे विस्मरण झाले आहे की काय अशीच परिस्थिती अपवाद वगळता जाणवू लागली होती .
२०१२ हे वर्ष रमाबाईंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्म - वर्ष . या निमित्ताने त्यांचे असाधारण जीवन आणि अतुलनीय कार्य परिचित करून देण्याचा स्तुत्य उपक्रम मॅजेस्टिक प्रकाशनने हाती घेतला आणि विलास खोले यांच्यासारख्या जाणकार , संशोधक प्रवृत्तीच्या लेखकाने रमाबाईंचे चरित्र सिद्ध करून तो तडीस नेला .
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|