प्रतीक प्रकाशनाची ही अप्रतिम निर्मिती. ज्यांच्या दर्शनाच्या स्पर्शाने संपूर्ण चित्रपट एक कविता बनून जात असे अशा बिमल रॉय यांची ही कहाणी. शशिकांत किणीकर यांनी बिमल रॉय यांच्या एकाहून एक सरस चित्रपटांच्या वेध घेत या मनस्वी दिग्दर्शकाची संपूर्ण कारकीर्द उलगडून दाखविली आहे. सुजाता, बंदिनी, मधुमती, परिणिता, दो बिघा जमीन यांच्यासह रॉय यांचा सर्व चित्रपटांचे कथासार, त्यातील कलाकार, चित्रपटाशी संबंधित गीतकार- संगीतकारांबरोबरच निर्मितीला हातभार लावणाऱ्यांचा तपशील ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये. व्यावसायिक बाजूच्या पलीकडे जाऊन कथाविषयाला पूर्ण न्याय देणे, कलकारांचा अभिनय पणाला लावून पडद्यावरच्या व्यक्तीरेखा जिवंत करणे हे बिमल रॉय यांचे कसब. ते कसे साधले गेले, त्यांच्या चित्रपटांना अमर स्थान का मिळाले हे वाचकांना या पुस्तकामुळे समजते. बिमल रॉय यांचे विचार, त्यांच्या संदर्भातील वेगवेगळ्या आठवणींचा खजिना आणि त्यांचा जीवनपट या सर्वांमुळे ‘बिमल रॉय’ पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेते. चित्रपट इतिहासाचे जाणकार असलेल्या शशिकांत किणीकर यांनी लेखनासाठी घेतलेली मेहनत जाणवते. दुर्मिळ छायाचित्रे वाचकांच्या आनंदात आणखी भर घालतात.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|