अभिनयसम्राट म्हटल्यावर हिंदीतील एकाच कलाकाराचे नाव चटकन डोळ्यापुढे देते ते म्हणजे दिलीपकुमार. ट्रॅजेडी किंग, अभिनयाचा बादशहा, अभिनयाचे आद्य विद्यापीठ अशा विविध प्रकारे दिलीपकुमारची ओळख करून दिली जाते. ही ओळख आणखी गहिरी करण्यात शशिकांत श्रीखंडे यांचे ‘दिलीपकुमार’ हे पुस्तक यशस्वी ठरले आहे, पुस्तक वाचताना श्रीखंडे यांनी लेखनासाठी घेतलेले परिश्रम प्रत्येंक वाचकाला जाणवतील. दिलीपकुमार यांनी असंख्य चित्रपट आपल्या अभिनयाने गाजविले. शोकात्म भूमिका आणि हसऱ्या – खेळकर भूमिका सारख्याच ताकदीने करणारा दुसरा अभिनेता दिसणार नाही. वेगळेपण श्रीखंडे समजावून देतात. दिलीपकुमारच्या जीवनाचा आणि रुपेरी कारकीर्दीचा एवढा समग्र आढावा घेणारे पुस्तक आत्तापर्यंत झाले नाही व यापुढे होणार नाही. प्रतीक प्रकाशनाची ही सुबक निर्मिती.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|