भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी दादासाहेब फाळके या मराठी व्यक्तीकडून व्हावी हा महाराष्ट्रासाठी अभिमानविषय. फाळके यांनी आपले संपूर्ण आयुष्य चित्रपट कलेसाठी वाहून घेतले. नंतरच्या काळात चित्रपटसृष्टीत मोठे कर्तृत्व गाजविणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञांचा गौरव फाळके यांच्या नावाचे पारितोषिक देऊन होणे औचित्याचेच होते. ते औचित्य केंद्र सरकारने पाळले आणि समर्पित भावनेने चित्रसृष्टीत कार्यरत राहिलेल्यांना गौरवण्याकरता फाळके पारितोषिक सुरू केले. आत्तापर्यंत ४१ जणांचा या पुरस्काराने गौरव झाला आहे. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा ग्रंथ या पुरस्काराच्या आजवरच्या मानकऱ्यांची माहिती देतो. मराठीत अशा प्रकारची माहिती एकत्रित स्वरुपात पुढे आली नव्हती. शशिकांत किणीकर यांनी ती माहिती ग्रंथरुपात सादर केली आहे. यामध्ये लता मंगेशकर, रुबी मायर्स, अशोक कुमार, देविकाराणी, बी.एन. सरकार, श्री. शांताराम यांसह अनेक दिग्गज वाचकांना भेटतील.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|