या पुस्तकातील प्रश्नोत्तरे आपल्याला केवळ दिलासा देण्यासाठी नसून जागृत करण्यासाठी आहेत... नि:शब्द करण्यासाठी आहेत... मौनात नेण्यासाठी आहेत... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खरंतर प्रश्न विचारणाऱ्याच्या अंतरंगातच असतं. हवी असते ती दृष्टी - ती समज - चिंतन - मनन. ज्यायोगे या विराट विश्वाकडे आणि आपल्या स्वत:कडे पाहण्याची तेजज्ञानाची, साक्षात्काराची एक वेगळीच दृष्टी लाभते. प्रश्नोत्तरांमध्ये स्वत:चा शोध घ्या, स्वानुभवावर स्थापित व्हा. अनुभव आविष्कृत करणे हे आपले मूळ उद्दिष्ट आहे. आपल्या आत्मस्वरूपाला जाणा.
या पुस्तकाच्या वाचनाने आपले आंतरिक अज्ञान नाहीसे होईल, अंतर्यामीच्या सखोल अज्ञानाचा अंत झाल्याचा उद्घोष होईल... तेव्हा जिज्ञासेचा जन्म होईल. "जीवन' स्वत:च प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे... हे पुस्तक आपल्याला "जीवन' वाचायची कला शिकवते, हृदयातून उपजलेल्या प्रश्नाची उत्तरं जिज्ञासा जागृत करतात... आनंद आणि संतुष्टी देतात... याच प्रश्नोत्तरांची उपनिषदं बनतात... नि:शब्द संवाद बनतात... याच प्रश्नाच्या गर्भातून परमज्ञानाचे मोती निघतात...
या पुस्तकातील प्रश्नोत्तरे आपल्याला केवळ दिलासा देण्यासाठी नसून जागृत करण्यासाठी आहेत... नि:शब्द करण्यासाठी आहेत... मौनात नेण्यासाठी आहेत... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खरंतर प्रश्न विचारणाऱ्याच्या अंतरंगातच असतं. हवी असते ती दृष्टी - ती समज - चिंतन - मनन. ज्यायोगे या विराट विश्वाकडे आणि आपल्या स्वत:कडे पाहण्याची तेजज्ञानाची, साक्षात्काराची एक वेगळीच दृष्टी लाभते. प्रश्नोत्तरांमध्ये स्वत:चा शोध घ्या, स्वानुभवावर स्थापित व्हा. अनुभव आविष्कृत करणे हे आपले मूळ उद्दिष्ट आहे. आपल्या आत्मस्वरूपाला जाणा. या पुस्तकाच्या वाचनाने आपले आंतरिक अज्ञान नाहीसे होईल, अंतर्यामीच्या सखोल अज्ञानाचा अंत झाल्याचा उद्घोष होईल... तेव्हा जिज्ञासेचा जन्म होईल. "जीवन' स्वत:च प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे... हे पुस्तक आपल्याला "जीवन' वाचायची कला शिकवते, हृदयातून उपजलेल्या प्रश्नाची उत्तरं जिज्ञासा जागृत करतात... आनंद आणि संतुष्टी देतात... याच प्रश्नोत्तरांची उपनिषदं बनतात... नि:शब्द संवाद बनतात... याच प्रश्नाच्या गर्भातून परमज्ञानाचे मोती निघतात...
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|