या पुस्तकात समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली तुम्हाला सापडेल. समस्या चुकीच्या दिशेने सोडवू पाहाल तर त्या सुटणार नाहीत आणि जर योग्य रीतीने सोडवू पाहाल तर तुमच्या ध्यानात येईल की समस्या मुळात नव्हतीच! समस्या योग्य दिशेने सोडवणे म्हणजे समस्या नाहीशा करणे.
समस्या कशा सोडवाल? खरंतर समस्या सोडवायच्या नाहीत. त्या कशा सुटत आहेत ते बघायचं आहे! माणूस समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतो पण तुम्ही अशा प्रयत्नातूनही बाहेर पडा. समस्या सुटलेली आहे. प्रार्थनांचा प्रतिसाद मिळालेला आहे. परंतु ही गोष्ट ध्यानात न घेता माणूस अजूनही प्रार्थनाच करीत बसला आहे. वास्तविक तो ज्याला जोरजोरात हाका मारतो आहे तो तर त्याच्या शेजारीच उभा आहे! याहून मोठा विनोद तो कोणता?
तुम्हाला तुमची समस्या कशी वाटते? दुःखाची दलदल की शिकवणारा शिक्षक? समस्या दलदल वाटत असेल तर तुम्ही कमळाप्रमाणे अलिप्त बना आणि समस्या शिक्षक वाटत असेल तर त्यातून सर्वोच्च विकास साधा. हेच या पुस्तकाचे लक्ष्य आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|