समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो पण हा डोंगर निर्माण झालाच कसा, याविषयी आपण कधीच विचार करत नाही. सगळी कामं तुंबून राहायला आपणच जबाबदार असतो. प्रत्येक काम आळशीपणानं टाळणं, निर्णयाशी वचनबद्ध असण्याचा अभाव या गोष्टींमुळे कामं साठत जातात. त्यांचा डोंगर संपवणं अशक्यप्राय वाटू लागतं. असंच जर कायम घडत राहिलं तर गुणवत्ता असूनही प्रगती अशक्य होऊन बसते. जीवन व्यर्थ जाण्याची शक्यता वाढते. जणू तुम्हाला हिरा मिळाला पण गारगोटी समजून तुम्ही तो फेकून दिला.
आपल्या जीवनातील सर्व शक्यतांचा आविष्कार करायचा असेल तर या दुष्टचक्रातून मुक्ती मिळवली पाहिजे. जबाबदारीने निर्णय घेण्याची आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी उचलण्याची कला आत्मसात केली पाहिजे. हे असं झालं तरच जीवन आनंददायी बनेल. यशस्वी बनेल.
निर्णय आणि जबाबदारी या पुस्तकात आपल्याला ही कला आत्मसात करण्याची विद्या सूत्ररूपाने आणि अतिशय सोप्या भाषेत दिली गेली आहे. म्हणूनच क्षणाचाही विलंब न करता पुस्तक वाचायला, अभ्यासाला सुरुवात करा. ज्यांच्या हातून चुकीने निर्णय घेतले गेले, त्यांना इतिहास एकवेळ क्षमा करेल परंतु ज्यांनी कधीच निर्णय घेतले नाहीत त्यांना कधीच माफ करणार नाही. म्हणूनच निर्णय घेण्याचा निर्णय आत्ताच घेऊया.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|