मोगरा फुलला...
फुले वेचिता बहरू कळियांसी आला
मोगर्याकडे पााहताना आपण आपलं अस्तित्वच विसरून जातो. राहतो तो केवळ अलौकिक आनंद. पण मोगरा मात्र हा आनंद सदासर्वकाळ जगतच असतो. त्याला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच नसते. फुलं देताना त्याच्या कुठल्याही अटी नसतात. उलट फुलं जेवढी जास्त वेचली गेली तेवढा जास्त तो कळ्यांनी बहरतो... अनिर्बंधपणे फुलं देत जातो! त्याचा स्वभाव आहे बिनशर्त प्रेम करणं!
अनादि-अनंत काळापासून सृष्टी आणि चराचर एकाच तत्त्वानं भारलेले आहेत. हे तत्त्व म्हणजे प्रेम. यात ‘स्व’चा संपूर्ण लोप झालेला असतो आणि म्हणूनच ते परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. माणसानं मात्र ‘मी’, ‘मला’, ‘माझं’ या वर्तुळात प्रेमाला फिरवून, प्रेमाला संकुचित करून टाकलं. म्हणूनच परमेश्वर आपल्यापासून कितीतरी दूर गेला आणि सर्व दु:खांना सुरुवात झाली. माणसाचं प्रेमही अजब होत गेलं... विविध अटी आणि हिशेब यात बंदिस्त झालं.
‘अहं’चा लोप होताच परमात्म्याशी मीलन घडवणारं प्रेम जन्म घेतं... त्याला कुठल्या अटी नसतात, की कुठल्या सीमा नसतात. हेच ते प्रेम... तेजप्रेम!
आपल्या जीवनात तेजप्रेम आविष्कृत करणारं हे पुस्तक म्हणजे एक चमत्कारच होय.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|