कर्म आणि फळ याचे शाश्वत सूत्र म्हणजेच कर्मसिद्धान्त. ह्या कर्मसिद्धान्तामागे कोणते तत्त्व आहे? कर्माच्या फळाची इच्छा का करू नये? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवता येईल? ह्या आणि अशा अत्यंत मौलिक प्रश्नांची उत्तरे सरश्रींनी ह्या पुस्तकात दिली आहेत. हे पुस्तक केवळ पुस्तकच नव्हे तर जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे.
आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची कर्मे आयुष्यभर करत असतो. कर्म आणि त्याचे फळ याविषयी पारंपरिक संकल्पनाही आपण जाणतो. परंतु यामध्ये काही निखळलेले दुवे आहेत का? करत असलेल्या कर्मांविषयी आपण किती सजग आहोत?
कर्माविषयी आणि कर्मफळाविषयी असणारे आपले गैरसमज दूर व्हायला हवेत. कर्मबंधनात न अडकण्याचे उपाय आपण समजावून घ्यायला हवेत. अशी सम्यक समज एकदा प्राप्त झाली की वर्तमानातल्या अधोगतीचे खापर पूर्वीच्या जन्मांवर फोडण्याचा मार्ग आपण पत्करणार नाही. आपल्या जीवनात कर्मकुशलता आणि कृतिशीलता यांचा आविष्कार घडेल आणि सुरू होईल केवळ आनंदाने भरलेला यशाचा प्रवास. कर्म करणे ही एक कला आहे. ती साध्य करण्यासाठी सजगतेने रियाज करायला शिकवणारे शिबिर म्हणजेच हे पुस्तक होय.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|